Chronic Fatigue Syndrome : रात्रभर झोपल्यानंतरही झोप येते आणि डोकेदुखी होते, म्हणून ही आहेत क्रॉनिक थकवा सिंड्रोमची लक्षणे !
दिवसभर काम आणि तणावाला सामोरे गेल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. यावर मात करण्यासाठी रात्रीची शांत झोप घेणं खूप गरजेचं आहे, पण जर तुम्ही अशा लोकांपैकी असाल जे रात्री पूर्ण झोप घेऊनही दिवसभर जांभई घेतात, थकवा जाणवतो, कोणतेही काम करावेसे वाटत नाही, ज्यामुळे तुमच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होऊ लागतो, तर तो क्रॉनिक थकवा सिंड्रोम आहे. चला जाणून घेऊया ही समस्या का उद्भवते, त्याची लक्षणे काय आहेत तसेच प्रतिबंधात्मक उपायांबद्दल. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामुळे विचार करण्याच्या आणि समजून घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. तसेच स्मरणशक्ती कमी होणे हे देखील क्रॉनिक थकवा सिंड्रोमचे लक्षण आहे . (Photo Credit : pexels )
त्याचबरोबर दिवसभर झोप येणे , स्नायू आणि सांधेदुखी- दीर्घकाळ खोकला येणे सतत थंडी वाजणे (Photo Credit : pexels )
जास्त घाम येणे ,खराब मूड डोळ्यांची जळजळ आणि कोरडेपणा, कामातील रस कमी होणे ,भूक न लागणे ही देखील क्रॉनिक थकवा सिंड्रोमचिंच लक्षणे आहे. (Photo Credit : pexels )
सामान्यत: ही समस्या रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या लोकांना प्रभावित करते. कामाचा ताण वाढताच अशा लोकांना थकवा जाणवू लागतो. (Photo Credit : pexels )
काही बॅक्टेरियाचे संक्रमण देखील यासाठी जबाबदार असू शकते. (Photo Credit : pexels )
लो ब्लड प्रेशरच्या समस्येने त्रस्त असलेले लोकही या समस्येच्या विळख्यात लवकर येतात.बराच काळ तणावाखाली राहिल्याने आणि कोणत्याही प्रकारच्या हार्मोनल असंतुलनामुळेही ही समस्या उद्भवू शकते. (Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )