Health Tips : थंड हवामानात 'या' गोष्टी खाणं ठरू शकतं धोकादायक, वाढू शकतो आजारांचा धोका !
अशा तऱ्हेने या ऋतूत मुलांची विशेष काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. रोगप्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने आजारी पडणे सामान्य बाब बनली आहे.विशेषतः लहान मुलांना थंड वाऱ्यापासून वाचवावे. याशिवाय जेवणाची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे.(Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appथंड हवामानात सतत काहीतरी खाल्ल्याने अनेक समस्या उद्भवतात. अशावेळी आपल्या आहाराची काळजी घेणंही खूप गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खाद्यपदार्थांविषयी सांगणार आहोत, जे तुम्ही थंड हवामानात खायला टाळावे . (Photo Credit : pexels )
तापमानात किंचित वाढ होताच लोक कोल्ड ड्रिंक्स वगैरे पिण्यास सुरुवात करतात. मात्र सौम्य थंडीतही कोल्ड ड्रिंक्स, मॉकटेल आदींचे सेवन करू नये. या गोष्टींचे सेवन केल्याने घसा खराब होतो. तसेच ते पिल्याने पचनक्रियेची समस्या वाढते. त्याऐवजी सूप, हर्बल चहाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.(Photo Credit : pexels )
अनेकदा थंडीत लोक गोड पदार्थांचे सेवन अधिक करू लागतात. थंड हवामानात मिठाई, पेस्ट्री खाण्याची एक वेगळीच मजा असते. तसेच ,जास्त गोड आपले वजन वाढवू शकते. त्यामुळे थंड हवामानातही मिठाई टाळणे फायदेशीर ठरते.(Photo Credit : pexels )
थंड हवामानात अनेक जण तळलेल्या पदार्थांचे मोठ्या उत्साहाने सेवन करतात. बऱ्याचदा लोकांना या ऋतूत बाहेरचे खाणे-पिणे आवडते, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. थंडीत हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे हेल्दी पदार्थांचा अवलंब करण्याचा प्रयत्न करा आणि बाहेरतळलेल्या पदार्थांऐवजी बेक्ड किंवा ग्रिल पदार्थ घरीच खा.(Photo Credit : pexels )
दुग्धजन्य पदार्थ कॅल्शियमचा चांगला स्रोत मानले जातात, परंतु कोणत्याही गोष्टीचा अतिरेक आरोग्यास हानी पोहोचवू शकतो. विशेषत: थंड हवामानात दुग्धजन्य पदार्थांचे जास्त सेवन केल्यास श्लेष्मा तयार होण्याची समस्या वाढते, ज्यामुळे कफ तयार होतो.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )