Cold Milk : उन्हाळ्यात रोज प्या थंड दूध, छाती आणि पोटाची जळजळ आणि हाय बीपीपासूनही मिळेल सुटका.
लहान मुले असोत वा प्रौढ, दुधाचे सेवन आरोग्यासाठी किती महत्त्वाचे आहे हे सर्वांनाच माहित आहे. सकाळी उठण्यापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गरम दूध पिण्याचा सल्ला तुम्ही ऐकला असेल, पण थंड दुधाचे फायदे तुम्हाला माहित आहेत का? तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या अनेक आवश्यक पोषक घटकांनी युक्त दूध थंड झाल्यानंतर पिले तर छाती आणि पोटात जळजळ, हाय बीपी आणि झोप न येणे यासारख्या समस्या दूर होऊ शकतात. चला जाणून घेऊया.(Photo Credit : pexels)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउन्हाळ्यात अनेकदा लोकांना छातीत जळजळ आणि पोटात जळजळ होण्याचा सामना करावा लागतो. अशावेळी कॅल्शियमयुक्त दूध अतिरिक्त आम्ल शोषून घेण्यास आणि आम्ल निर्मिती रोखण्यास खूप उपयुक्त ठरते. (Photo Credit : pexels)
त्यामुळे आजकाल तुम्हीही पचनसंस्थेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर थंड दुधाचे सेवन अवश्य करा. यामुळे अॅसिड रिफ्लक्समुळे होणारी चिडचिड दूर होते.(Photo Credit : pexels)
शांत झोप घेण्यासाठी थंड दुधाचे ही सेवन केले जाऊ शकते. ते पिल्याने बीपीमध्ये चढ-उतार होण्याची समस्या राहत नाही आणि शरीर रिलॅक्स होते. याशिवाय दिवसभराच्या धावपळीच्या आयुष्यानंतर तणाव आणि चिंता यासारख्या समस्या दूर करण्यासाठीही थंड दूध खूप फायदेशीर आहे. (Photo Credit : pexels)
हाई बीपी को कंट्रोल थंड दूध पिणे खूप फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि शरीरातील स्ट्रेस हॉर्मोन्सही कमी होतात. उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. अशावेळी ज्यांचा बीपी अनेकदा जास्त असतो त्यांनीही थंड दूध प्यावे.(Photo Credit : pexels)
वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून गरमापेक्षा थंड दूध पिणे अधिक फायदेशीर ठरते. व्यायाम आणि आहाराबरोबरच थंड दुधाला रुटीनचा भाग बनवल्यास अनेक फायदे मिळू शकतात. हे पिल्याने मेटाबॉलिझम वाढते, ज्यामुळे अतिरिक्त कॅलरीबर्न होतात. (Photo Credit : pexels)
तसेच पोट बराच वेळ भरलेले राहते आणि तुम्हाला भूक लागत नाही. अशा प्रकारे अतिखाण्यापासून तुमचा बचाव होतो आणि हळूहळू वजन कमी होण्याचा फायदा दिसू लागतो.(Photo Credit : pexels)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels)