Food Time : नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ तुम्हाला माहित आहे का? आजपासून फॉलो करा, आजारी पडणार नाही!

नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण योग्य वेळी झाले पाहिजे, तरच शरीराला त्याचा पूर्ण फायदा होतो. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारून तुम्ही अनेक धोकादायक आजारांपासून स्वतःचा बचाव करू शकता. (Photo Credit : pexels )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी सुधारल्या तर लठ्ठपणा, मधुमेह, पोटाशी संबंधित अनेक समस्या आपण टाळू शकतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे प्रत्येकाने दिवसातून तीनही वेळा खाण्याच्या वेळेकडे सर्वाधिक लक्ष दिले पाहिजे. चला जाणून घेऊया नाश्ता, लंच आणि डिनरसाठी सर्वात योग्य वेळ कोणती? (Photo Credit : pexels )

तज्ज्ञांच्या मते, नाश्ता आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी योग्य वेळी नाश्ता करावा. यासाठी सकाळी 7 ते 8 ही उत्तम वेळ आहे. नाश्ता सकाळी 10 नंतर कधीही करू नये. हे लक्षात ठेवले पाहिजे की सकाळी उठल्यानंतर 30 मिनिटांच्या आत काहीतरी खाल्ले पाहिजे.(Photo Credit : pexels )

फिट आणि हेल्दी राहायचे असेल तर संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत जेवण करा. रात्री 9 नंतर कधीही खाऊ नका. झोपण्याच्या 3 तास अगोदर जेवण करणे आरोग्यासाठी चांगले असते.(Photo Credit : pexels )
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : pexels )