Lemon Honey Juice : रोज लिंबू-मधाचा रस पिण्याचे 'हे' आहेत फायदे!
रिकाम्या पोटी कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो यसहितच तुम्ही लठ्ठ नसले तरी लिंबू आणि मध पिऊन तुम्ही अनेक आजारांपासून मुक्ती मिळवू शकता. .वाचा रोज लिंबू-मधाचा रस पिण्याचे काय फायदे आहेत. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलिंबू आणि मध देखील तुमच्या त्वचेसाठी चांगले असतात. यामुळे सुरकुत्यापासून आराम मिळतो. लिंबू रक्त शुद्ध करते. त्यामुळे त्वचा चमकदार होते.[Photo Credit : Pexel.com]
लिंबू आणि मधाचे हे पेय घेतल्याने शरीराला आवश्यक प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम समाविष्ट आहे. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती तर सुधारतेच पण संसर्गापासूनही तुमचे संरक्षण होते. [Photo Credit : Pexel.com]
मध आणि लिंबू गरम पाण्यासोबत घेतल्यास पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो. पोट खराब असणाऱ्यांसाठी मध आणि लिंबू हा एक चांगला पर्याय आहे. हे प्यायल्याने पोट साफ राहते. [Photo Credit : Pexel.com]
हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास देखील मदत करते. पचनक्रिया चांगली झाल्याने चयापचय क्रियाही सुधारते. [Photo Credit : Pexel.com]
लिंबू आणि मधाचा रस रिकाम्या पोटी प्यायल्याने चरबी कमी होते. तसेच जास्त वजनापासून तुमचे रक्षण करते. [Photo Credit : Pexel.com]
तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असेल तर अशा परिस्थितीत तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी दिवसाची सुरुवात मध आणि लिंबाच्या रसाने करा. [Photo Credit : Pexel .com]
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर लिंबू पाण्यात काही थेंब मध मिसळून प्या. लिंबूमध्ये असलेले फायबर इरिटेबल बोवेल सिंड्रोममध्ये देखील मदत करते. [Photo Credit : Pexel.com]
कोमट पाणी घेतल्याने मल सहज बाहेर पडण्यास मदत होते . त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या हळूहळू कमी होऊ लागते. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel. com]