Monsoon Special: पावसाळ्यात भाजलेला मका खावासा वाटतोय? तर मग मक्याचे हे '6' फायदेही पाहा! चवीलाही छान आणि आजारांपासूनही राहाल लांब
पावसाळ्यात भाजलेला मका किंवा भुट्टा खाण्याचा विचार जरी केला, तरी जिभेवर मस्त चव रेंगाळते. मका तब्येतीसाठीही फायदेशीर ठरतो. मक्यात कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि कार्बोहायट्रेटला उर्जेचं प्रमुख स्त्रोत मानलं जातं. त्यामुळे, मका खाल्ल्यानं पोट देखील भरतं आणि याशिवाय शरीराला भरपूर उर्जाही मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमका हा मॅग्नेशियम, आयर्न, फॉस्फरस यांसारख्या खनिजांनी परीपूर्ण असतो आणि यामुळे संधीवातासारख्या समस्या टाळता येतात.
आपलं वय वाढतं तसतसं चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ लागतात.पण मका हा बिटा-कॅरोटिनने परिपूर्ण असते. यातील व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी तुमची त्वचा निरोगी ठेवण्यास आणि वय वाढीच्या लक्षणांना रोखण्यास मदत करतात.
मक्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि फ्लेवोनॉईड्स भरपूर प्रमाणात असतात आणि यामुळे कॅन्सरचा धोका कमी होतो. याशिवाय मक्यात फेरूलिक अॅसिड असते जे स्तन आणि लिव्हरमधील ट्यूमरचा आकार कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावते.
मक्याच्या कणसात फोलेट देखील भरपूर असते, ज्याला व्हिटॅमिन बी 9 देखील म्हणतात. हे पोषक तत्व आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे उपयोगी करते. गर्भधारणेदरम्यान महिलांसाठी हे विशेषतः महत्त्वाचं आहे. फोलेट निरोगी लाल रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये आणि गर्भाशयात बाळाच्या विकासात योगदान देते.
मक्यात व्हिटॅमिन ए ची तत्व देखील असतात, जे तुमची दृष्टी सुधारण्यास आणि डोळ्यांसंबंधित समस्या रोखण्यास फायदेशीर ठरतात.