Photo: मोमोजप्रेमींसाठी धोक्याची घंटा... आरोग्याच्या या समस्या उद्भण्याची शक्यता
आजच्या धकाधकीच्या जीवनात लोकांच्या खाण्याच्या सवयीदेखील बदलल्या आहेत. कामासाठी बहुतांश वेळ घराबाहेर असल्याने फास्ट फूड हे लोकांच्या रोजच्या सवयींचा भाग झाला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे पिझा, बर्गर, नुडल्स अशा अनेक खाण्याच्या गोष्टींवर भारतीय भर देताना दिसत आहेत. या फास्ट फूडच्या यादीत अलिकडे मोमोजची भर पडली असून ते अनेकांच्या पसंतीचे खाद्य झालं आहे.
लहान मुलांपासून ते वयोवृद्धापासून सर्वांनाच मोमोज खायला आवडतं. पण तेच मोमोज आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकतं.
पण या मोमोज खाण्याचे आपल्या आरोग्यावर कोही नकारात्मक परिणामही होऊ शकतो. फक्त मोमोजच नव्हे तर त्यासोबत मिळणारी चटणीही आपल्या आरोग्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
मोमोजमध्ये मैद्याचा वापर केला जातो. मोमोज खायला सॉफ्ट व्हावेत यासाठी त्याच्या मैद्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्टार्चचा वापर केला जातो. पण या स्टार्चमुळे आपल्या पोटाचा घेर मात्र वाढण्याची जास्त शक्यता आहे.
मोमोज खाल्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्टोरॉल आणि ब्लड ट्रायग्लिसराईड म्हणजे बॅड कोलेस्टोरॉलची वाढ अधिक होते. यामुळे आपल्या शरीराला मात्र हानी पोहोचू शकते.
मोमोजला सॉफ्ट बनवण्यासाठी त्याच्या मैद्यामध्ये अॅजोडिकार्बोनामाईड आणि बेझॉईल पॅरॉक्साईडचा वापर केला जातो. हे दोन्ही पदार्थ आपल्या शरीरासाठी अत्यंत घातक असतात. आपल्या पॅनक्रिजसाठी ते अत्यंत हानिकारक असतात.
मोमोजच्या आतमध्ये भाज्या आणि चिकनचा वापर केला जातो. मग ते मोमोज जास्त कालावधीसाठी ठेवल्यास मात्र खराब होऊ शकतात. त्याचं सेवन केल्यास आपल्या शरीराला हानी पोहोचू शकते.
अनेकांना मोमोजसोबत तिखट चटणी खायला आवडते. परंतु ही तिखट चटणी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरु शकते. त्याचं अधिक प्रमाणात सेवन केल्यामुळे पाईल्सचा त्रास सुरू होऊ शकतो.
पॅनक्रिजला धोका पोहोचल्याने इन्शुलिन हार्मोनचे सिक्रेशन व्यवस्थित होऊ शकत नाही. त्याचा परिणाम म्हणजे डायबेटिसचा धोका वाढू शकतो. मोमोजचे अधिक सेवन केल्यास डायबेटिसचा धोका वाढण्याची शक्यता कितीतरी पटीने अधिक असते.