Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
walking Benefits : हिवाळ्यात कधी आणि किती वेळ चालणे फायदेशीर ठरू शकते, जाणून घ्या,
चालणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे चयापचय वाढते, हृदय-मेंदूचे आरोग्यही सुधारते. यामुळे शरीर उबदार राहण्याबरोबरच वजनही नियंत्रित राहते. याशिवाय चालण्याचे अनेक फायदे आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळ-संध्याकाळ चालणे आरोग्यासाठी आरोग्यदायी असते. त्याचे अनेक फायदे आहेत. दैनंदिन जीवनात ही अनेक जण फिरायला जातात, पण हिवाळा येताच फिरायला जाणे टाळू लागतात. काही लोकांना सकाळी उठायला त्रास होतो, काही जण आळशीपणामुळे बाहेर पडत नाहीत, पण जर तुम्ही खरोखरच हिवाळ्याच्या हंगामात फिरायला गेलात तर नक्कीच फायदेशीर ठरू शकते.
हिवाळ्यात फिरायला जाण्यापूर्वी अशाप्रकारे काळजी घ्या. योग्य कपडे परिधान करूनच फिरायला जा.शरीर पूर्णपणे झाकून च घराबाहेर पडा.
उबदार कपड्यांना प्राधान्य द्या. वेगाने आणि लवकर चालणे किंवा धावणे सुरू करू नका.
घराबाहेर पडताच हळू हळू चालायला सुरुवात करा आणि मग चालण्याचा वेग वाढवा.
थंडीत सकाळी उठण्यास त्रास होत असेल तर सकाळी 8.30 ते 9.30 किंवा संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान फिरायला जाऊ शकता. यावेळी थंडीची शक्यता कमी असते.
तज्ज्ञांच्या मते, दररोज 10,000 पावले चालणे फायदेशीर आहे. मात्र, बिझी शेड्युलमुळे एवढ्या दिवसांच्या स्टेप काऊंट पूर्ण करणे सर्वांनाच शक्य होत नाही. अशा वेळी हिवाळ्यात आठवड्यातून किमान पाच दिवस अर्धा तास फिरायला जावे. यामुळे आरोग्याला अनेक आजारांपासून वाचवता येईल .
टीप : हृदयाशी संबंधित समस्या, दमा किंवा न्यूमोनिया असेल तर सकाळी फिरायला जा