Winter Snack: जाणून घ्या खजूर लाडू बनवण्याची रेसिपी..
खजूर हे एक अतिशय शक्तिशाली ड्रायफ्रूट आहे जे कार्बोहायड्रेट्स, लोह, फायदेशीर चरबी, आहारातील फायबर, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, पोटॅशियम आणि प्रथिने यांसारख्या गुणधर्मांचे भांडार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखजूर खाल्ल्याने तुमचे हृदय आणि मेंदूचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्यास मदत होते.
अशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी खजूर लाडू बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. रोज खजूर खाल्ल्याने बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्ती मिळते.
यासोबतच रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खजूर रामबाण औषधापेक्षा कमी नाही. खजूर तुमची हाडे मजबूत करतात, ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत राहते, चला तर मग जाणून घेऊया खजुराचे लाडू बनवण्याची पद्धत-
खजूर लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य- गव्हाचे पीठ 1/2 कप, खजूर 200 ग्रॅम, किसलेले नारळ, 2 चमचे तूप, बदाम, मनुका, काजू, पिस्ता
खजुराचे लाडू बनवण्याआधी खजूर पूर्णपणे स्वच्छ करून घ्या. नंतर खजुर बारीक करून एका भांड्यात अलगद ठेवा. यानंतर कढईत तूप टाकून वितळवून घ्या.
नंतर त्यात नारळ आणि सर्व ड्रायफ्रुट्स घालून साधारण 1-2 मिनिटे परतून घ्या. यानंतर हे भाजलेले ड्रायफ्रुट्स प्लेटमध्ये काढा. मग या कढईत एकदा तूप टाकून वितळवून घ्या. यानंतर त्यात पीठ घालून ते ब्राऊन होईपर्यंत चांगले परतून घ्या.
नंतर एका मोठ्या भांड्यात या सर्व गोष्टी एकत्र करून नीट मिक्स करा. यानंतर हे मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यातून मध्यम आकाराचे लाडू बनवा. आता तुमचे उर्जेने भरलेले खजूर लाडू तयार आहेत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)