Kiwi Benefits : निरोगी आरोग्य हवे आहे? मग आजपासूनच हे फळ खाण्यास सुरुवात करा
निरोगी जीवनशैलीसाठी तुम्ही संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या दोन्ही गोष्टींची योग्य प्रकारे सांगड घातली तर आरोग्याच्या समस्या निर्माण होणार नाहीत. (Photo Credit : Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपण,आजकाल वयाची चाळीशी जरी ओलांडली तरी शरीराला थकवा येण्यास सुरूवात होते. हाडे कमजोर होऊ लागतात.(Photo Credit : Pixabay)
कालांतराने आपल्या शरीराची रचना बदलू लागते, जे हाडांमधील कमकुवतपणाचे लक्षण मानले जाते. हल्ली लहान वयातच उठताना, बसताना, चालताना अडचणींना सामोरे जावे लागते. या अवस्थेकडे वेळीच लक्ष दिले नाही तर ते हाडांच्या आजाराचे रूप धारण करू शकते.(Photo Credit : Pixabay)
शरीराचा पाया हा हाडांवर अवलंबून आसतो. त्यामुळे त्यांना बळकट करण्यासाठी आपल्या आहारात काही गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. किवी हे फळ तुम्हाला यात मदत करू शकते.(Photo Credit : Pixabay)
किवी हे कॅल्शियम समृद्ध फळ मानले जाते. एक कप किवीमध्ये 61.2 मिलीग्राम कॅल्शियम असते. अशावेळी याचे सेवन हाडांना आतून मजबूत करण्याचे काम करते.(Photo Credit : Pixabay)
किवीमध्ये कॅल्शिअमसोबतच इतर पोषकघटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश आढळून येतो. या पोषकघटकांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. हिवाळ्यात आपल्या सर्वांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.(Photo Credit : Pixabay)
शिवाय, थंडीच्या दिवसांमध्ये संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे, आपण सर्दी-खोकल्यासारख्या आजारांना लगेच बळी पडतो.(Photo Credit : Pixabay)
या आजारांपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही आहारात किवीचा जरूर समावेश करावा.(Photo Credit : Pixabay)
किवीमध्ये कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअमसोबतच फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. या फायबर्समुळे शरीर तंदूरूस्त राहण्यास मदत होते. शिवाय, किवीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे, मधुमेहींसाठी देखील हे फळ फायदेशीर आहे.(Photo Credit : Pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Pixabay)