Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
In Pics : अननसाने करा वजन कमी, हाडं बनवा मजबूत
वजन कमी करण्यासाठी आहारात फळांचा अधिक समावेश करावा. फळांमध्ये फायबर आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. फळांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअननसात कॅलरीज आणि कार्बोहायड्रेट्स कमी असतात. त्यामुळे वजन कमी होते.
अननसामुळे पचनक्रिया सुधारायलादेखील मदत होते. तसेच यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने भूक नियंत्रणात राहते.
अननस खाल्ल्याने शरीरातील लेप्टिन हार्मोन कमी होतो. या हार्मोनद्वारे शरीरातील वजन नियंत्रित करता येते. ज्यांचे वजन जास्त आहे त्यांच्या शरीरात लेप्टिनचे प्रमाण जास्त असते.
हाडे मजबूत करण्यासाठी अननसाचे सेवन करावे. अननसामध्ये कॅल्शियम असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
अननस रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. अननसामुळे सर्दीची समस्या दूर होण्यास मदत होते. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.