Back Pain : पाठदुखी असेल तर ते हलक्यात घेऊ नका! असू शकतो हृदयविकाराचा धोका!
आजकाल हार्ट अटॅकसारख्या आजारचा धोका झपाट्याने वाढत आहे. शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे ३० ते ४० वयोगटातील लोकांमध्ये हृदयाशी संबंधित आजार सामान्य होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही प्रकरणांमध्ये लोकांना अचानक पाठदुखी होत असल्याचे दिसून येत आहे. विनाकारण अचानक पाठदुखी जास्त होत असेल तर ती हलक्यात घेऊ नये. विशेषत: दुखण्याबरोबरच श्वास लागणे किंवा छातीत दुखणे जाणवत असेल तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हा हृदयविकाराच्या झटक्याचा धोका असू शकतो .
हृदयविकाराचा झटका ही एक गंभीर स्थिती आहे ज्यामध्ये हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील रक्तप्रवाह अचानक थांबतो. जेव्हा हृदयापर्यंत पुरेसे रक्त पोहोचत नाही, तेव्हा शरीराच्या इतर भागात ऑक्सिजन आणि पोषक तत्वांची कमतरता असते. यामुळे हृदयविकाराच्या झटक्यादरम्यान पाठ, हात, पोट किंवा मान अशा शरीराच्या कोणत्याही भागात अचानक तीव्र वेदना सुरू होऊ शकतात.
छातीत दुखणे किंवा दाब: छातीत जडपणा, जळजळ किंवा वेदना होण्याच्या तक्रारी हृदयविकाराच्या झटक्याचे सर्वात सामान्य लक्षण आहेत
श्वास घेण्यास त्रास होणे: श्वास लागणे किंवा अचानक घाम येणे किंवा थंडी वाजणे ही देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षण असू शकतात .
चक्कर येणे: विनाकारण अचानक चक्कर येणे आणि हलकी डोकेदुखी जाणवणे. तसेच भूक न लागणे ही देखील हृदयविकाराच्या झटक्याचे लक्षणे आहेत
त्यानंतर उलट्या आणि मळमळ कोणत्याही कारणाशिवाय होऊ शकते मात्र हृदयविकाराच्या झटक्याचेही हे कारण असू शकते .
टीप : पाठीच्या खालच्या भागात अचानक दुखणे कधीकधी हृदयविकाराचा झटका दर्शविते.तसेच हृदयविकाराच्या झटक्याची यापैकी कोणतीही लक्षणे असू शकतात त्यामुळे अशी वेदना सहसा खूप हलक्यात घेऊ नये. असे काही असेल तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.