औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्ष खाल्ल्यानं मृत्यू होऊ शकतो? यामागचं सत्य काय?
इंटरनेटवर कधी, कोणती गोष्ट व्हायरल होईल काही सांगता येत नाही. इंटरनेवर अनेक वेळा आरोग्यासंबंधित माहिती किंवा उपाय तसेच टीप्सही व्हायरल होतात. पण इंटरनेटवर व्हायरल होणाऱ्या सर्वच गोष्टी खऱ्या ठरतात, असं नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइंटरनेटवरील आरोग्यासंबंधित दावे किंवा उपायांवर विश्वास ठेवण्याआधी तज्ज्ञ आणि डॉक्टरांना विचारा आणि त्यांचा सल्ला नक्की घ्या.
सध्या इंटरनेटवर एक दावा खूप व्हायरल होत आहे. या दाव्यामध्ये सांगितलं जात आहे की, एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेचच द्राक्षं खाल्ली तर, संबंधित व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या दाव्यांमध्ये म्हटलं जात आहे की, जर एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षं खाल्ली तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो.
औषधानंतर द्राक्षं खाल्यावर त्याची रासायनिक प्रतिक्रिया होते, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत औषध घेतल्यानंतर द्राक्षे खाऊ नयेत, अन्यथा हा त्रास होऊ शकतो, असा दावा केला जात आहे.
आता यामागची खरी वस्तुस्थितीत काय आणि यामध्ये किती तथ्य आहे ते जाणून घ्या. काही वेबसाइट्सनी या व्हायरल दाव्यामागची सत्यता तपासली आहे. यामध्ये, हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचं आढळून आलं आहे.
एखाद्या व्यक्तीने औषध घेतल्यानंतर लगेच द्राक्षे खाल्ल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, असं कोणतंही कारण समोर आलेलं नाही. अनेक आरोग्य तज्ज्ञांनी याबाबत सांगितलं आहे की, या दाव्यात तथ्य नाही, असं काही होत नाही.
या दाव्याच्या पडताळणीमध्ये समोर आलं आहे की, काही औषधे आणि द्राक्ष एकमेकांच्या संपर्कात आल्यावर त्यांच्यात रासायनिक क्रिया होते. पण याचा अर्थ असा होत नाही की, यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो. आतापर्यंत अशी कोणतीही घटना समोर आलेली नाही.
काही खाद्यपदार्थांमध्ये काही रसायने असतात, याचा शरीरातील चयापचय प्रक्रियांवर परिणाम होतो. नैसर्गिक खाद्यपदार्थांचा शरीरावर परिणाम होत नाही असं नाही. त्याचप्रमाणे फळांचाही शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो.
पण याचा अतिशय गंभीर परिणाम होऊन यामुळे मृत्यू होतो, असं कोणतंही प्रकरण समोर आलेलं नाही. त्यामुळे इंटरनेटवर व्हायरल झालेला दावा खोटा आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.