तणाव दूर करण्यासाठी करा हे उपाय, राहाल आनंदी!
सध्याच्या धावपळीच्या काळात प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीला तणावाचा सामना करावा लागतो. तणावामुळे इतर आजार होण्याची भीती असते. जर, तुम्हीदेखील तणावाचा सामना करत असाल तर त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुमच्या दैनंदिन कामातून विश्रांती घ्या आणि आवडीच्या ठिकाणी पर्यटनासाठी जा. यामुळे तुमचा मूड फ्रेश होईल आणि थकवा, तणाव, नैराश्य दूर होईल.
निसर्गाच्या जवळ जा. निसर्गाने संपन्न असलेले राष्ट्रीय उद्याने, उद्याने आदी ठिकाणी काही वेळ घालवा. चिंता मुक्त होऊन निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने थकवा निघून जातो. एक नवी ऊर्जा मिळते.
अधिक तणाव जाणवत असेल, काय करावे हे सुचत नसले तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचे संगीत, गाणी ऐका. संगीतामुळे तुमच्या शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते.
आपल्या मित्रांसह अथवा ज्यांच्यासोबत संवाद साधल्याने तुम्हाला आनंद मिळतो, अशा व्यक्तींसोबत वेळ घालवा. तुमच्या मनातील गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. जुन्या आठवणींना उजाळा द्या.
आयुष्यात अनेकदा आपण कामात अधिक व्यस्त असल्यामुळे तणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे तुमच्या दिनचर्येत काही बदल करावा. वेळेवर उठणे, थोडा व्यायाम करावा, मॉर्निंग वॉकसाठी जावे, घराची स्वच्छता करून वस्तू नीटनेटक्या ठेवाव्यात.
तुम्ही असे काम करा, ज्याने तुम्हाला आनंद मिळतो. जर, तुम्हाला शॉपिंग करणे आवडत असेल तर शॉपिंगला जा. फोटोग्राफी, चित्रकला, नृत्य आदींचा छंद असेल तर तो जोपासावा.