Tulsi Tea : हिवाळ्यात घसादुखी, खवखव यांमुळे त्रस्त्त आहात? तुळशीच्या पानांचा चहा ठरेल रामबाण उपाय
हिवाळ्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्दी आणि घशासंबंधित समस्या अनेकांना सतावतात. घसा खवखवणे, घसा दुखणे हा त्रास बहुतेकांना होता. पण यापासून सुटका मिळवण्यासाठी एक रामबाण उपाय आहे. ( PC : istockphoto.com )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिवाळ्यात घसादुखी, खवखव यांमुळे त्रस्त्त असाल तर तुळशीच्या पानांचा चहा तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. तुमच्या समस्येपासून तुम्हाला झटपट सुटका मिळेल.( PC : istockphoto.com )
तुळस ही औषधी वनस्पती आहे. आरोग्यासाठी तुळशीचे औषधी गुणधर्म साऱ्यांनाचा माहित आहेत.( PC : istockphoto.com )
तुळशी, मसाले आणि मध यांपासून बनलेला चहा हा अँटिऑक्सिडंटने समृद्ध असतो. हा चहा रोग प्रतिकारशक्ती आणि ऍलर्जी आणि बदलत्या ऋतूतील परिणामांशी लढण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो.( PC : istockphoto.com )
तुळशीचा चहा तयार करण फार सोपं आहे. यासाठी सर्वात आधी एका भांड्यात दोन ते तीन कप पाणी घ्या. यामध्ये दालचिनीचा तुकडा टाकून चांगलं उकळवा.( PC : istockphoto.com )
तुळशीची सात ते आठ पाने स्वच्छ धुवून ती उकळत्या पाण्यात घाला. यामध्ये तुम्ही तुळशीच्या पानांसह जायफळ आणि छोटी लिंबाची फोड घाला. ( PC : istockphoto.com )
हा चहा झाकून ठेवा आणि तीन मिनिटे चहाला चांगलं उकळवून घ्या.( PC : istockphoto.com )
आता हा चहा गाळून घ्या. यामध्ये मध मिसळल्यावर तुमचा गरमागरम तुळशीच्या पानांचा चहा तयार आहे.( PC : istockphoto.com )
तुळशीच्या वनस्पतीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटीबायोटिक गुणधर्म असतात. यामुळे तुम्हाला सर्दी आणि घसादुखीपासून आराम मिळेल. ( PC : istockphoto.com )