Health Tips : तुम्हला ही झोपेत घोरण्याची सवय आहे? मग या कडे दुर्लक्ष करू नका...
घोरल्याने फक्त जवळ झोपलेल्या व्यक्तीला त्रास होत नाही, तर हे अनेक गंभीर आजारांचे लक्षण असू शकते. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहृदयरोग तज्ज्ञांच्या मते, झोपेच्या वेळी वारंवार आणि मोठ्याने घोरणे खूप धोकादायक ठरू शकते.याकडे कधीही दुर्लक्ष करू नये अन्यथा समस्या वाढू शकते.(Photo Credit : Unsplash)
तुम्हाला माहितीये का? घोरणे तुमच्या जीवावर बेतू शकते. कसे ते जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)
वास्तविक घोरण्यामुळे झोपेची प्रत खालावते आणि त्याचा परिणाम दिवसभरात थकवा किंवा पेंग येणे असा होतो. (Photo Credit : Unsplash)
घोरण्याबरोबर येणारा 'स्लीप अॅप्निया' हा विकार धोकादायक ठरू शकतो. हा विकार गाढ झोपेत होत असल्याचे सांगितले जाते. (Photo Credit : Unsplash)
'स्लीप अॅप्नियाची' समस्या ही घोरण्याचे सर्वात मोठे लक्षण मानले जाते. 'स्लीप अॅप्नियाची' समस्या असलेल्या रुग्णाला झोपेत असताना श्वासोच्छ्वास थांबल्यासारखे वाटते आणि नंतर पुन्हा सुरू होतो असे जाणवते. (Photo Credit : Unsplash)
याशिवाय जास्त झोप, थकवा, सतत डोकेदुखी, तोंड कोरडे राहणे, रात्री वारंवार लघवी होणे यासारख्या समस्याही उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)
पुरूषांना 'स्लीप अॅप्नियाचा' धोका जास्त असतो, पण स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान किंवा रजोनिवृत्तीच्या वेळी आणि त्यानंतर काही काळासाठी 'स्लीप अॅप्निया' टाळायला हवा. हार्मोनल बदलांमुळे या आजाराचा धोका वाढू शकतो. (Photo Credit : Unsplash)
हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकेल असा कोणताही उपचार आजपर्यंत समोर आलेला नाही. पण, शरिराच्या हालचालींवर नियंत्र ठेवून घोरणे थांबविले जाऊ शकते. (Photo Credit : Unsplash)
धावपळीच्या जीवनात शांत झोप न मिळाल्याने घोरणे, श्वास घेण्यास त्रास होणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात. (Photo Credit : Unsplash)