Heart Attack : हृदयविकाराचा झटका येण्याआधी दिसतात 'ही' लक्षणं; जाणून घ्या
हृदय विकाराचा आजार असलेल्यांना हार्ट अॅटकचा अधिक धोका असतो. हार्ट अॅटक येण्याआधी शरिरात काही बदल दिसून येतात. जाणून घेऊयात या बदलांबाबत... (Photo - Pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहार्ट अॅटक येण्याआधी छातीत दुखणे आणि अस्वस्थ वाटू लागते. अशा स्थितीत तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Photo - Pixabay)
या स्थितीत तुमच्या छातीच्या मध्यभागी अथवा डाव्या हाताच्या बाजूला अधिक जडपणा जाणवू शकतो. (Photo - Pixabay)
काही लोकांना हार्ट अॅटक येण्याआधी अशक्तपणा आणि चक्कर येणे आदी लक्षणे दिसू शकतात. त्याशिवाय जबडा, पाठ आणि मानेत दुखणे, अस्वस्थ जाणवणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. (Photo - Pixabay)
हार्ट अॅटक येण्याआधी श्वास घेण्यासही त्रास जाणवू शकतो. यामध्ये रुग्णाला धाप लागणे आदी लक्षणेही जाणवू शकतात. (Photo - Pixabay)
कोणत्याही शारिरीक मेहनतीशिवाय थकवा जाणवणे, उलटी आणि मळमळ जाणवणे आदी लक्षणे जाणवू शकतात (Photo - Pixabay)
हार्ट अॅटकची लक्षणे दिसू लागल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या स्थितीत रुग्णाला तातडीने उपचाराची गरज असते. (Photo - Pixabay)
जर, तुमच्या घरात एखादा हृदय विकाराने आजारी असल्यास त्यांना सकस आहार द्यावा. तणावापासून त्यांना दूर ठेवावे. यामुळे हार्ट अॅटकचा धोका कमी असतो. (Photo - Pixabay)