Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Men Health Tips : पुरुषांनी आहारात लायकोपीनचा समावेश करावा, कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून होईल सुटका
हे मानवी शरीरात नाही तर वनस्पतींमध्येच आढळते अँटिऑक्सिडंट (Antioxidant) आहे. हे पोषक तत्व पुरुषांसाठी फार आवश्यक आहे. (PC:istock)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहे पोषकतत्व वनस्पतींद्वारे तयार केले जातात. त्यामुळे आहारामध्ये लायकोपीनच्या स्त्रोतांचा समावेश करणे फार गरजेचं आहे. (PC:istock)
लायकोपीन हे अँटिऑक्सिडेंट आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्याचे काम करते. लायकोपीन लिपिड प्रोटीन आणि डीएनएचे ऑक्सिडेटिव्ह नुकसान होण्यापासून बचाव करते. (PC:istock)
यासोबतच हृदय निरोगी ठेवण्यातही हे पोषक तत्वं खूप फायदेशीप आहे तसेच यामुळे अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. (PC:istock)
लायकोपीन पोषक तत्वं एक अँटिऑक्सिडेंट आहे. हे अँटीऑक्सिडंट्स शरीराच्या डीएनए आणि पेशींच्या संरचनेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करून कर्करोगाचा धोका कमी करतात. (PC:istock)
अलिकडे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचे प्रमाण वाढलेले दिसून येत आहे. काही संशोधनानुसार, लायकोपीनच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो. लायकोपीनची उच्च पातळी प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करू शकते. (PC:istock)
लायकोपीन एलडीएल म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यात मदत करते. लायकोपीनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो. (PC:istock)
कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के प्रमाणेच लायकोपीन अँडीऑक्सिडेंटदेखील हाडे मजबूत होण्यास मदत करते. लायकोपीन हाडांमधील ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास देखील मदत करते. ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे हाडांची रचना कमकुवत होते, म्हणून पुरुषांनी लायकोपीनयुक्त अन्न सेवन केले पाहिजे. (PC:istock)
टोमॅटो हा लायकोपीनचा मुख्य स्त्रोत आहे. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. एक कप ताज्या टोमॅटोमध्ये 3041 मायक्रोग्रॅम लायकोपीन असते. ताजे टोमॅटो लाइकोपीनचा चांगला स्रोत आहे. (PC:istock)
पपई हे असे फळ आहे ज्यामध्ये लायकोपीन देखील आढळते. एका कप पपईमध्ये सुमारे 18028 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते आणि यामध्ये कॅलरीजही खूप कमी असतात. (PC:istock)
पेरू हा लायकोपीनचा चांगला स्रोत आहे. यामध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी यासह ओमेगा-3 आणि फायबर देखील आढळतात. एका कप पेरूमध्ये 5204 मायक्रोग्रॅम लायकोपीन आढळते. (PC:istock)
कलिंगडामध्ये लायकोपीन आढळते तसेच यामुळे जे शरीरातील पाण्याची कमतरताही दूर होते. (PC:istock)