Health Tips : आंबट-गोड किवी फळात आहे आरोग्याचा खजिना; पाहा फायदे
किवी हे असेच एक फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमिन-सी मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सही आढळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appरोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच शरीराला अनेक आजारांशी लढण्याची ताकद देते. हे रोज खाल्ल्याने अस्थमा सारख्या आजारांपासून बऱ्याच अंशी आराम मिळतो.
व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम देखील किवीमध्ये मुबलक प्रमाणात आढळते. हे रक्तवाहिन्यांना निरोगी ठेवते आणि तुमचे हृदय मजबूत करते. याशिवाय व्हिटॅमिन ई देखील त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे
किवी हे मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप चांगले मानले जाते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, या फळामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते.
किवी खाल्ल्याने सेरोटोनिन वाढवणारी रसायने सक्रिय होतात, ज्यामुळे रात्री चांगली झोप लागते. मधुमेहाच्या रुग्णाने दररोज किवीचे सेवन करावे.
किवी हा आरोग्याचा खजिना मानला जातो. या फळामध्ये अनेक प्रकारची पोषक तत्वे आढळतात. ल्युटीन प्रमाणेच झेक्सॅन्थिन, फायटोकेमिकल्स असतात. ते शरीरात लोहाचे शोषण वाढवण्यास मदत करतात.
अॅनिमियाची समस्या असलेल्या लोकांना याचा फायदा होतो. दररोज एक किवी खाल्ल्याने अनेक फायदे मिळू शकतात. डोळ्यांसाठीही हे एक अत्यंत महत्त्वाचे फळ मानले जाते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.