Health Benefits of Rose : तुम्ही कधी गुलाबाचे फायदे एकलेत का? जाणून घ्या काय आहेत फायदे
जवळपास सर्वांनाच गुलाबाचे फूल आवडते. विशेष म्हणजे गुलााचे फूल ही प्रेमाची निशाणी म्हणून ओळखले जाते. विविध रंगांची गुलाबाची फुले पाहिली की मन अगदी प्रसन्न होते. (Photo Credit : pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगुलाबाचे फूल आणि त्याचा सुगंध सर्वांनाच आवडतो. गुलाबाला फुलांचा राजा असेही म्हणतात. गुलाबाचे फूल जितके दिसायला सुंदर आहे तितके त्याचे फायदे देखील खूप आहेत. (Photo Credit : pixabay)
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे अनेक आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांवर गुलाब एक उत्तम औषध म्हणून कार्य करते. (Photo Credit : pixabay)
गुलाबाकडे पाहिल्याने तणाव दूर होतो. त्याचप्रमाणे गुलाबाचा प्रभाव थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात त्याचे सेवन करणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त गुलाबाचे अजून कोणते फायदे आहेत. जाणून घेऊया. (Photo Credit : pixabay)
गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये आढळणारे घटक शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास तसेच चयापचय वाढविण्यास मदत करतात. तसेत त्यामुळे लठ्ठपणा कमी होतो. (Photo Credit : pixabay)
जर माणसाला वारंवार भूक लागत असेल तर गुलाबाच्या पाकळ्या खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. यामुळे वजनही नियंत्रणात राहते. त्यामुळे गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करणे फायदेशीर मानले जाते. (Photo Credit : pixabay)
ज्या लोकांना मूळव्याधीचा त्रास आहे, त्यांनी गुलाबाच्या पाकळ्यांचे सेवन करावे. यामध्ये असलेले फायबर आणि पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. (Photo Credit : pixabay)
गुलाबामध्ये व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स चांगल्या प्रमाणात आढळतात. जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात. यासाठी तुम्ही गुलाबाच्या पाकळ्यांपासून बनवलेल्या गुलकंदच्या स्वरूपातही गुलाबाचे सेवन करू शकता. (Photo Credit : pixabay)
जर एखाद्या व्यक्तीला थकवा, नैराश्य आणि तणावामुळे झोपेचा त्रास होत असेल तर आपल्या पलंगावर काही गुलाब ठेवा. गुलाबाच्या सुगंधानेही मन शांत होते आणि तणाव दूर होण्यास मदत होते. (Photo Credit : pixabay)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : pixabay)