How To Get Fair Skin: 'या' जादुई तेलाचा वापर करून त्वचा बनवा तमन्ना भाटियासारखी गोरी!
हिवाळा आला की त्वचेच्या समस्या येणं सामान्य गोष्ट आहे. यातील एक समस्या म्हणजे त्वचा काळवंडणे. ही एक समस्या आहे ज्यामध्ये कोपर आणि गुडघे सारखे त्वचेचे काही भाग काळे होतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअशा परिस्थितीत आज आम्ही तुमच्यासाठी खोबरेल तेलाचा बॉडी पॅक घेऊन आलो आहोत. हा पॅक ऑलिव्ह ऑईल आणि तिळाच्या मदतीने तयार केला जातो.
ऑलिव्ह ऑइलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या त्वचेच्या काळ्या भागात मॉइश्चरायझेशन ठेवण्यास मदत करते. याशिवाय खोबरेल तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन के असते.
तुमच्या त्वचेवरील मृत त्वचा काढून रंग सुधारणारे गुणधर्म यात आढळतात, म्हणून नारळाच्या तेलाचा बॉडी पॅक कसा बनवायचा ते जाणून घेऊया-
खोबरेल तेल बॉडी पॅक बनवण्यासाठी आवश्यक साहित्य- नारळ तेल 3-4 चमचे, तीळ, ऑलिव्ह तेल 1-2 टीस्पून
खोबरेल तेलाचा बॉडी पॅक बनवण्यासाठी सर्वप्रथम एक वाडगा घ्या. मग त्यात ३-४ चमचे खोबरेल तेल, १-२ चमचे ऑलिव्ह ऑईल आणि काही तीळ टाका.
यानंतर या तीन गोष्टी नीट मिसळा.
आता तुमचे गुडघे आणि कोपर साफ करण्याचा घरगुती उपाय तयार आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)