नवीन वर्षात 'या' तपासण्या करा, टेन्शनमुक्त व्हा!
काहीवेळेला एखाद्याला आरोग्याची एखादी समस्या असू शकते हे कळतही नाही. हे टाळण्यासाठी, तुम्ही काही आरोग्याची तपासणी चाचण्या करून घेतल्या पाहिजेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचाचणी केल्यामुळं आजार वाढण्यापूर्वी तुम्हाला सतर्क केले जाईल. त्यामुळं तुम्हाला काळजी घेणं सोपं होईल.
संपूर्ण रक्तासंदर्भात चाचणी करा. याद्वारे तुम्हाला अॅनिमियासह रक्ताशी संबंधित कोणत्याही प्रकारच्या संसर्गाची माहिती मिळेल.
रक्ताच्या चाचणीमुळं वाढलेले हिमोग्लोबिन, ल्युकेमिया इम्यून थ्रोम्बोसाइटोपेनिया याती माहिती मिळते, लवकर उपचार घेण्यास मदत होते.
लघवीची तपासणी करून घेणेही आवश्यक आहे. यामुळे मूत्रात रक्त आणि प्रथिनांची उपस्थिती मूत्रपिंडाच्या आजारांचे लवकर निदान करण्यास मदत करते.
व्हिटॅमिन डी किंवा व्हिटॅमिन बी 12 देखील तपासले पाहिजे. यामुळे शरीराशी संबंधित अनेक समस्या समोर येतात आणि वेळेत त्या सुधारण्यास मदत होते.
मॅमोग्राम ही एक अशी चाचणी आहे की ती करून घेतल्यास, स्तनाच्या कर्करोगाचा प्रारंभिक अवस्थेचा शोध लावला जाऊ शकतो आणि आपल्याला शक्य तितक्या लवकर उपचार मिळू शकतात.
पॅप स्मीअर चाचणी करणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग लवकर ओळखला जातो आणि या आजारावर वेळीच उपचार करता येतात.
. यकृत कार्य चाचणी करणे देखील आवश्यक आहे. त्यामुळे फॅटी लिव्हर, सिरोसिस यासारख्या समस्या आढळून येतात.