Milk Benefits : या गोष्टी मिसळून दूध प्यायल्याने आरोग्याला होतील जबरदस्त फायदे; जाणुन घ्या!
दुधात पोषक तत्वे असतात. दूध पिणे केवळ शरीराच्या विकासासाठीच नाही तर त्याच्या ताकदीसाठी देखील आवश्यक आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि आवश्यक खनिजे असतात ज्यांचा आरोग्यासाठी फायदा होतो.
आल्यामध्ये अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.
हे दूध रोगप्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करते. कोमट दुधात आले मिसळून प्यायल्याने सर्दी, खोकल्यासारख्या आजारात आराम मिळतो.
अंजीराचे दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
अंजीरमध्ये अनेक पोषक तत्वे असतात ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. त्यामध्ये फायबर देखील भरपूर असते आणि ते पचनासाठी फायदेशीर असतात.
हळदीच्या दुधात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे प्यायल्याने दुखणे आणि सूज येण्याची समस्या दूर होते. हळदीमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.
खजूरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक असतात. त्याचा प्रभाव गरम आहे. हिवाळ्यात खजूरसोबत दूध प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि आजार दूर राहतात.
बदामाचे दूध आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बदामामध्ये रिबोफ्लेविन आणि एल-कार्निटाइन सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे आरोग्याला फायदा होतो. दूध आणि बदाम एकत्र प्यायल्याने हाडे मजबूत होतात. बदामाचे दूध प्यायल्याने मेंदूही तीक्ष्ण होतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (सर्व फोटो सौजन्य : unsplash.com)