Health Tips: उपाशी पोटी चुकूनही खाऊ नका 'ही' चार फळे; अन्यथा आरोग्यावर होतील दुष्परिणाम
सकाळी सकाळी उपाशी पोटी कॅफेनयुक्त पदार्थांचं सेवन करू नये, हे सगळ्यांनाच माहिती असतं. पण उपाशी पोटी काही फळे खाऊ नयेत. हे बहुतांश लोकांना माहिती नसतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरे तर फळे खाण्याचे अनेक फायदे आहेत. पण चुकीच्या वेळी फळे खाल्यामुळे त्याचे फायदे कमी आणि जास्त नुकसान होतं.
तुम्हाला माहितीचं आहे की, फळांपासून भरपूर पोषक तत्व मिळतात. त्यामुळे आपल्याकडे आजारी व्यक्तीला फळे किंवा फळांचा ज्यूस देण्याचा सल्ला दिला जातो.
पण तुम्हाला हे माहितीये का? तुम्ही योग्य वेळी फळे खाल्ली तरंच त्यातील पोषण तत्वांपासून फायदा मिळू शकतो. पण चुकीच्या वेळी फळे खाल्यामुळे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे कोणत्या वेळेत फळे खायला हवीत, हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.
पण बहुतांश लोक आपल्या आरोग्याबद्दल सजग नसल्यामुळे उपाशी पोटी चुकीची फळे खातात आणि अनेक आजारांना निमंत्रण देतात. आज आपण अशाच काही फळांची महिती घेणार आहोत, जे उपाशी पोटी कधीही खाऊ नयेत.
संत्री आणि मोसंबी : संत्रे, मोसंबी हे खायला आंबट असतात. यासारखी फळे उपाशी पोटी खाल्लं, तर तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते. तसेच तुमची पचनसंस्थाही बिघडू शकते. तु्म्ही सकाळी उपाशी पोटी फळे खाल्लं तर अॅसिडिटी, गॅस आणि आंबट ढेकरं येणं यासारख्या समस्या येऊ शकतात.
केळी : बऱ्याजणांना सकाळी केळी खायची सवय असते. पण चुकूनही उपाशी पोटी केळी खाऊ नका. कारण उपाशी पोटी केळी खाल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. यामुळे पोटात गोळा आल्यासारखं होऊ शकतं. याशिवाय बद्धकोष्ठतेची समस्या होऊ शकते.
अननस : अननस हे फळ उपाशी पोटी खाऊ नये. कारण अननसमध्ये फ्रुक्टोजचं प्रमाण भरपूर असतं. यामध्ये फायबर आणि विटामिन सी भरपूर असतं. यामुळे तुमची मेटाबॉलिज्म सिस्टीम मंद होते आणि तुम्ही आजारी पडण्याची शक्यता असते.
किवी : किवी या फळांमध्ये विटामिन सी भरपूर असतं. यामुळे किवी कधीही उपाशी पोटी खाऊ नका. कारण आंबट ढेकरं येणं, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होणं यासारख्या समस्या होऊ शकतात.