PHOTO : तुमचेही मन थंडीत उदास राहते का? तुम्ही हिवाळ्यातील नैराश्यात आहात का? मग 'हे' उपाय करा
थंडीबरोबर शरीरात आळस वाढतो. जेव्हा जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा त्याचा आपल्या मूडवरही परिणाम होतो. काही लोकांमध्ये हे नैराश्याचे रूप घेऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appखरंतर हिवाळ्यात बरेच दिवस सूर्यप्रकाश नसतो. याचा थेट परिणाम आपल्या मूडवर होतो. या काळात अनेकांची चिडचिड होऊ लागते आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांना राग यायला लागतो. याला हिवाळ्यातील नैराश्य म्हणतात.
हिवाळ्यातील नैराश्य हे सूर्यप्रकाशामुळे होते, कारण त्याचा मूडशी खोल संबंध असतो. हिवाळ्यात आपल्या शरीराच्या जैविक घड्याळात होणारे बदल अगदी सामान्य असतात. कमी सूर्यप्रकाशामुळे सेरोटोनिनची पातळी कमी होते, ज्यामुळे हिवाळ्यातील नैराश्य येते.
आपल्या देशात दरवर्षी सुमारे एक कोटी लोक थंडीच्या हंगामात हिवाळ्यातील नैराश्याच्या विळख्यात सापडतात. मनाला जाग येण्यासाठी आणि सतर्क राहण्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश खूप महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हिवाळ्यात सकाळचा सूर्यप्रकाश आवश्यक मानला जातो. कारण सूर्यप्रकाश आपल्याला जागे होण्यासाठी आणि सतर्क राहण्यास तयार करतो.
सकाळचा सूर्यप्रकाश शरीराला निरोगी कोर्टिसोल प्रदान करतो आणि नैराश्यापासून बचाव करतो. सकाळच्या सूर्यप्रकाशातून हॅपी हार्मोन डोपामाइन देखील बाहेर पडते, ज्यामुळे मन प्रसन्न होते.
हिवाळ्यात सकाळचा सूर्यप्रकाश आरोग्यासाठी चांगला मानला जातो. मानसिक आरोग्यासाठीही हे चांगले आहे. हिवाळ्यात उन्हापासून दूर राहण्यापेक्षा थोडा वेळ उन्हात घालवावा.
हिवाळ्यात मोकळ्या जागेत उन्हात बसल्याने शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही आणि थकवा, चिडचिडेपणा, सुस्ती आणि मूड स्विंगसारखे हंगामी भावनिक विकार देखील यामुळे टाळता येतात.