Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dal Rice Benefits :वरणभात खाण्याचे फायदे! दिवसातून किती वेळा वरणभात खायाला हवा
वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशातील प्रत्येक राज्यातील खाद्यसंस्कृती जरी वेगळी असली तरी डाळ-भात किंवा वरणभात हा पदार्थ कुणाला माहित नाही, असे होऊच शकत नाही. (Photo credit: Unsplash)
आपल्या देशात क्वचितच कोणी असेल की ज्याने अजूनपर्यंत वरणभात खाल्ला नसेल. आपल्या भारतात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात. त्यापैकी एक असलेला हा वरणभात लोक आवडीने खातात.(Photo credit: Unsplash)
वरणभात हा पदार्थ पचायला हलका आणि तितकाच पोषकतत्वांनी परिपूर्ण आहे. हा वरणभात अनेक जण दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात आवर्जून खातात. हा हलका आहार घेतल्याने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात.(Photo credit: Unsplash)
वरणाच्या डाळींमध्ये आणि भातामध्ये हेल्दी फॅट्स, अँटिऑक्सिडंट्स, प्रोटिन्स, फायबर्स आणि व्हिटॅमिन्स इत्यादी पोषकघटक मुबलक प्रमाणात आढळून येतात. आज आपण वरणभात खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतात? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.(Photo credit: Unsplash)
त्यामुळे, वरणभात खाल्ल्यानंतर तुम्हाला इतर खाद्यपदार्था खाण्याची क्रेव्हिंग होत नाही. शिवाय, पोट भरलेले राहते त्यामुळे, वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.(Photo credit: Unsplash)
वजन कमी करण्यासाठी लाभदायी वजन कमी करण्यासाठी डाळी आणि कडधान्ये फायदेशीर मानली जातात. कारण, डाळी आणि कडधान्यांमध्ये प्रथिने आणि फायबर्सचे भरपूर प्रमाण आढळून येते. (Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo credit: Unsplash)