Health Care : उन्हाळ्यात 'सन पॉयजनिंग'चा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
सन पॉयजनिंग हे सनबर्नचे घातक रुप आहे. तुम्ही अधिक वेळ सूर्याच्या अतिनील किरणाच्या संपर्कात राहिल्याने होतो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसन पॉयजनिंगचा त्रास उद्भवल्यास वैद्यकीय उपचाराने समस्येवर मात करता येते.
गंभीर स्वरूपात रॅशेस् येणे, त्वचेवर फोड येणं, डिहायड्रेशन, चक्कर येणे, श्वास घेण्यास त्रास होणे, बेशुद्ध होणे ही सन पॉयजनिंगची लक्षणे आहेत.
सन पॉयजनिंगचा परिणाम त्वचेवर होतो. तुम्ही अधिक वेळ उन्हात राहता, त्यावेळेस अल्ट्राव्हायलेट किरणे तुमच्या त्वचेचं नुकसान करतात. त्यामुळे तुम्हाला वेदना होतात. याच्या परिणामी अशक्तपणा, बेशुद्ध होणे, थकवा जाणवणे आदी लक्षणं जाणवतात.
तुम्हाला अशी लक्षणे दिसत असल्यास तुम्ही अधिक प्रमाणात पाणी, फळांचा रस आदी द्रव पदार्थांचे सेवन करावे. त्याशिवाय सन पॉयजनिंग झालेल्या ठिकाणी स्पर्श करणे टाळावे.
सन पॉयजनिंग टाळण्यासाठी सनस्क्रीनचा वापर करावा. एसपीएफ 30 पेक्षा अधिक असलेल्या सनस्क्रीन लोशनचा वापर करावा. उन्हात जाण्याआधी कमीत कमी 15 ते 30 मिनिटे आधी सनस्क्रीन लावावे. दर दोन तासांनी सनस्क्रीन लावावी.
उन्हात जाण्याआधी त्वचा पूर्ण झाकली जाईल असे पूर्ण कपडे घाला. त्याशिवाय, सनग्लासेसचा वापर करावा. उन्हात जाताना टाइट कपड्यांऐवजी ढीले कपडे घालावे. उन्हाळ्यात सकाळी 10 ते सायंकाळी 4 दरम्यान घरातून बाहेर न पडण्याचा प्रयत्न करावा. नवजात बालकं, लहान मुलांना उन्हात नेणं टाळावे.