Health tips:औषधांसोबतच तुम्ही काही घरगुती उपयांनीही रक्तदाब नियंत्रणात ठेवू शकता, जाणून घ्या काही खास टिप्स...
तुमच्या आहारात धान्य, फळे, भाज्या, कमी फॅट्स असलेले दुग्धजन्य पदार्थ, मांस, मासे आणि काजू यांचा समावेश करा. सोडा, ज्यूस आणि मीठ यांचं सेवन कमी करा.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदररोज अर्धा ते एक तास व्यायाम केल्यास उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. व्यायामामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. गंभीर आजारांचा धोका टळतो.(Photo credit: Unsplash)
जास्त वजनही तुमचं हाय ब्लडप्रेशर वाढवण्यासाठी कारण ठरू शकतं. त्यामुळे वजन कमी करून तुम्ही हाय ब्लडप्रेशरसोबतच शरीराच्या इतर समस्याही नियंत्रणात ठेवू शकता. (Photo credit: Unsplash)
जास्त तणावामुळेही ब्लड प्रेशर वाढतं. त्यामुळे हाय ब्लडप्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी तणावापासून दूर राहा. अजिबात टेन्शन घेऊ नका. (Photo credit: Unsplash)
जर तुम्हाला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवायचा असेल, तर मद्यपान करणं टाळा. तसेच, धूम्रपान करू नका. (Photo credit: Unsplash)
कारण यामुळे उच्च रक्तदाब असलेल्या लोकांमध्ये हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. (Photo credit: Unsplash)
धूम्रपान आणि अल्कोहोल सोडल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. यामुळे अनेक आजार होऊ शकतात.(Photo credit: Unsplash)
जर तुम्हाला हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल, तर तुम्ही वेळोवेळी तपासणी केली पाहिजे. औषधांचा आणि जीवनशैलीतील बदलांचा किती परिणाम होतो हे यावरून दिसून येते. (Photo credit: Unsplash)
सर्व प्रयत्न करूनही जर बीपी कमी होत नसेल, तर योग्य उपचार करा, कारण कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे सावध राहा, पथ्य पाळा आणि काळजी घ्या.(Photo credit: Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही(Photo credit: Unsplash)