Weight Loss Tips : वजन नियंत्रित ठेवण्यासाठी भिजवलेले मनुके खा; महिलांसाठी अत्यंत लाभदायी
मनुका भिजवल्याने त्यांचे पौष्टिक मूल्य वाढते हे तुम्हाला क्वचितच माहीत असेल. आत्तापर्यंत तुम्ही गोड पदार्थात किंवा कधी कधी कोरडे करून मणुके खाल्ले असतील, पण ते भिजवून शरीरासाठी पोषकतत्त्वे वाढतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइतकेच नाही तर भिजवलेले मनुके खाल्ल्याने तुमचे वजन नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर, याच्या सेवनाने तुमची हाडेही मजबूत होतात. विशेषत: महिलांसाठी हे अनेक प्रकारे फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया भिजवलेल्या मणुका खाण्याचे इतर कोणते फायदे आहेत.
मनुक्यामध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे तुमची गोड खाण्याची इच्छा कमी होते. म्हणूनच ते तुमचे वजन वाढू देत नाही. हे रक्तातील साखरेचे प्रमाण राखण्यास मदत करते. बेदाण्यामध्ये फायबर असते, त्यामुळे तुम्ही ते स्नॅक म्हणूनही खाऊ शकता.
महिलांनी मनुक्याचे सेवन करणे आवश्यक आहे. त्यामुळे हाडांची घनता वाढण्यास मदत होते. त्यात तांबे असते, ज्यामुळे लाल रक्तपेशी तयार होतात. अॅनिमिक लोकांनी विशेषतः दररोज याचे सेवन करावे.
मनुक्यामध्ये फायबर असते, म्हणूनच ते तुम्हाला बद्धकोष्ठतेपासून वाचवतेच पण पचनक्रिया देखील चांगली ठेवते.
भिजवलेल्या मणुक्यामध्ये पॉलिफेनॉल फायटोन्यूट्रिएंट्स असतात, जे तुमच्या डोळ्यांच्या स्नायूंसाठी चांगले असतात.
भिजवलेल्या मनुक्यामध्ये जीवनसत्त्व बी आणि सी असतात, जी प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक असतात. अशाप्रकारे, ते तुम्हाला संसर्गापासून वाचवते.