Benefits of Flaxseed : आरोग्यासाठी गुणकारी आळशीच्या बिया; लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी, हृदय आणि मधुमेह रुग्णांसाठी वरदान
Health Benefits of Flaxseed : आळशीला (Flaxseed) जवस असेही म्हणतात. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. या बिया त्वचा, केसांसाठी वरदान असून पचनाची समस्या दूर करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी यांचा वापर केला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआळशी ह्रदयाशी संबंधित आजारांमध्ये फायदेशीर आहे आणि कोलेस्ट्रॉल कमी करते. हे खाल्ल्याने मधुमेह आणि रक्तदाबही नियंत्रित राहतो. जवस आरोग्यासाठी उत्तम गुणकारी आहे. यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यात मदत होत. तसेच हे हृदय आणि मधुमेहासाठीही वरदान आहे.
आळशी म्हणजेच जवस हे सुपर फूड आहे. जे खाल्ल्याने तुम्हाला पूर्ण पोषण मिळते. त्वचाही चमकदार होते.
यामध्ये आढळणारे पोषकतत्वे आणि खनिजे पोटातील चांगले बॅक्टेरिया वाढवतात, ज्यामुळे पचनक्रिया मजबूत होते.
या बियामध्ये ओमेगा 3 असते आणि त्यात भरपूर फायबर असते, त्यामुळे हे खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते.
यामध्ये आढळणारे काही पोषक तत्व जळजळ, पार्किन्सन रोग आणि दमा यांसारख्या आजारांना दूर ठेवतात.
आळशी खाल्ल्याने तुम्हाला लोह, पोटॅशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, सोडियम, फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड यांसारखे सर्व आवश्यक पोषक घटक मिळतात.