Health Tips : शरीराला थंडावा देण्याबरोबरच बहुगुणी ताकाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
ताकामध्ये शरीर थंड ठेवण्याबरोबरच अनेक औषधी घटक देखील असतात. जाणून घ्या ताकाचे फायदे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ताकाच्या सेवनाने शरीरातील चरबी देखील कमी होते. इतकेच नव्हे तर, ताक त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे.
ताकात व्हिटामिन B 12, कॅल्शियम, पोटेशियम आणि फॉस्फरससारखे घटक असतात, असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ताक शरीरातील उष्णता त्वरित कमी करून, शरीराला आतून थंड करते
वारंवार लघवीचा त्रास होत असेल, तर ताकात मीठ टाकून प्यावे. यामुळे त्रास कमी होतो.
जायफळ पूड ताकात मिसळून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.
तुम्हाला जर पोटदुखीचा त्रास असेल तर अशा वेळी ताक प्यायल्यास तुमची पोटदुखी थांबेल.
तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळी ताकात साखर आणि काळीमिरी घालून प्यावे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.