Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PHOTO: अल्झायमर्स अन् डिमेन्शिया आजाराबद्दल जागरुकता, मुंबईत अवेरेथॉन ‘ए वॉक फॉर कॉज’
अल्केम फाउंडेशन आणि अल्झायमर्स अँड रिलेटेड डिसऑर्डर्स सोसायटी ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेतर्फे आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अल्झायमर्स जागरूकता अभियानाचे आयोजन करण्यात आले.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया अभियानात 500 हून अधिक जणांनी सहभाग घेतला.
यात वैद्यकीय व्यावसायिक, केअरगिव्हर्स, कॉर्पोरेट क्षेत्रातील लोक आणि खासगी संस्थांच्या प्रतिनिधींसह समाजाच्या विविध वर्गांतील लोकांचा समावेश होता.
यावेळी विविध पारंपरिक नृत्य, खेळ यांच्या मार्फत जागृती करण्यात आली.
2019 मध्ये 3.84 दशलक्ष व्यक्ती डिमेन्शियाने ग्रस्त होत्या.
हा आकडा 2050 सालापर्यंत 11.44 दशलक्षांपर्यंत जाईल असा अंदाज आहे.
अल्झायमर्स या आजारामध्ये रुग्णाची स्मरणशक्ती व विचार करण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते
व्यक्तीच्या दैनंदिन जीवनशैलीवर व स्वास्थ्यावर परिणाम पर्यंत हा आजार पोहोचतो.
याविषयी जगजागरण करण्यासाठी ख्यातनाम सायकिएट्रिस्ट, न्युरोलॉजिस्ट व न्युरोसर्जन आदी वैद्यकतज्ज्ञांनी या कार्यक्रमाची सुरुवात केली.
त्यानंतर लोकजागृतीच्या उद्देशाने 1.5 किलोमीटर एवढ्या अंतराची अवेरथॉनचे आयोजन केले होते.