Aloe Vera Juice Benefits : सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफीने नव्हे तर कोरफड ज्यूसने करा, होतील 'हे' फायदे
चहा-कॉफीचे व्यसन असलेल्या लोकांनी त्यांच्या दिवसाची सुरुवात कॅफिनने केली नाही तर त्यांचा संपूर्ण दिवस सुस्तीत जातो. पण ही फक्त एक सवय आहे जी बदलली जाऊ शकते आणि चहा आणि कॉफी व्यतिरिक्त इतर काही आरोग्यदायी पेयांकडे वळू शकतात.(Photo Credit : freepik )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसकाळच्या सुरुवातीला चहा किंवा कॉफी घेण्याऐवजी कोरफडीचा रस घेऊ शकता. दिवसाची सुरुवात करण्यासाठी कोरफडीचा रस सर्वोत्तम मानला जातो. (Photo Credit : freepik )
याच्या सेवनाने आरोग्यावर सकारात्मक परिणाम तर होतोच पण त्यामुळे त्वचा चमकते आणि केसही दाट राहतात. (Photo Credit : freepik )
पचनशक्ती वाढवणे असो किंवा रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे असो, कोरफडीचा रस तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.(Photo Credit : freepik )
कोरफडीमध्ये अँटिऑक्सिडंट भरपूर असतात जे तुमचे वजन आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. कोरफडमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट पॉलीफेनॉल असतात,(Photo Credit : freepik )
जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. एकूणच कोरफड व हे आरोग्यासाठी उत्तम टॉनिक ठरू शकते(Photo Credit : freepik )
ज्या लोकांना व्हिटॅमिन सीच्या कमतरतेचा त्रास आहे त्यांनी सकाळी उठल्यावर कोरफडीचा रस प्यावा. कोरफडीमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. (Photo Credit : freepik )
व्हिटॅमिन सी हा एक प्रकारचा अँटिऑक्सिडेंट आहे जो शरीरात लोहाचा पुरवठा करण्यास मदत करतो. याशिवाय व्हिटॅमिन सी अँटीबॉडीज आणि कोलेजन तयार करण्यातही मदत करते.(Photo Credit : freepik )
जर तुम्ही दररोज सकाळी उठल्यानंतर कोरफडीचा रस प्यायला तर ते तुमच्या तोंडाचे आरोग्य सुधारतेच पण तुमच्या हिरड्या मजबूत होण्यासही मदत करू शकतात. जर तुम्ही दररोज सकाळी कोरफडीच्या रसाने गार्गल केले तर ते तुमच्या तोंडातील दुर्गंधी दूर करण्याचे काम करते.(Photo Credit : freepik )