Acidity Remedies : 'हे' उपाय ट्राय करा अन् अॅसिडीटीपासून झटपट सुटका मिळवा
धकाधकीची जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर अनेक परिणाम होतात. अनेक समस्यांचा आपल्याला सामना करावा लागतो. त्यापैकी एक मुख्य समस्या म्हणजे, अॅसिडीटी.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक औषधांचा आधार घेतला जातो. त्याऐवजी काही घरगुती उपायांच्या मदतीनं अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यात मदत होते.
अॅसिडीटीचा त्रास दूर करण्यासाठी रोज सकाळी 1 आवळा खा. अॅसिडीटीच्या समस्येपासून सुटका करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.
पोटाच्या कोणत्याही समस्येवर ओवा अत्यंत गुणकारी ठरतो. गॅस, अपचन आणि मळमळ यांवर ओव्याचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्यासाठी गुळही फायदेशीर ठरतो.
जिरं आणि जिऱ्याची पावडरचा आहारात समावेश करा आणि अॅसिडीटीपासून सुटका मिळवा.
कलिंगडातील पोषक तत्वं अॅसिडीटी दूर करण्यास मदत करतात.
अॅसिडीटीचा त्रास होत असेल तर बडिशोपचं पाणी प्या.
अॅसिडीटीमुळे पोटातील जळजळ आणि पोटदुखी दूर करण्यासाठी थंड दूध प्या.