Ashadhi Wari 2023: आषाढीला बनवा उपवासाची 'ही' खास रेसिपी; बनवायलाही झटपट अन् चवीलाही रुचकर

साबुदाण्याचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य: भिजवून घेतलेले साबुदाणे - 3 वाट्या, उकडलेले बटाटे - 3, हिरव्या मिरच्या - 5-6, शेंगदाण्याचा कूट - 1 वाटी, मीठ - चवीनुसार , तेल/तूप - अंदाजानुसार, लिंबाचा रस - 1 चमचा, थालीपीठ थापण्यासाठी प्लास्टिक शीट
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शेंगदाणे तव्यावर हलके भाजून हातावर चोळून त्याची सालं काढावीत आणि मिक्सरमध्ये बारीक करावे. हिरव्या मिरचीची देखील मिक्सरमध्ये पेस्ट करुन घ्यावी.

त्यानंतर बटाटे नीट उकडून घ्यावे आणि नंतर एका डिशमध्ये काढून कुस्करुन घ्यावे.
त्यानंतर त्यात भिजवलेले साबुदाणे, हिरव्या मिरचीची पेस्ट, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ, लिंबाचा रस घालावे. आता हे सर्व मिश्रण हाताने मळून घ्यावे. तयार मिश्रणाचे गोळे करुन घ्यावे.
या तयार पिठाचे थालीपीठ थापताना पोळपाटावर प्लॅस्टिकचा कागद किंवा कॉटनचा रुमाल पाण्यात भिजवून ओला करून अंथरावा.
आता या प्लॅस्टिकवर किंवा ओल्या रुमालावर अलगद हातांनी थालीपीठ थापून घ्यावे, थालीपीठ थापताना हाताला थोडे पाणी लावावे.
गोलाकार आकारात थालीपीठ थापून घेतल्यांनंतर तव्यावर घालून खरपूस भाजून घ्यावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे.
तव्यावर आपल्या आवडीनुसार तेल किंवा तूप सोडावे आणि मध्यम आचेवर थालीपीठ दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावे.
उपवासासाठी तयार केलेले साबुदाण्याचे खुसखुशीत थालीपीठ दह्यासोबत सर्व्ह करावे.