Food : आरोग्यासाठीच नाही तर चवीतही अव्वल! 'फणसाचे मिल्क शेक' बनवण्याची सोपी रेसिपी जाणून घ्या...
तुम्ही फणसाची भाजी, बिर्याणी किंवा भजी ऐकलं असेल, पण तुम्ही त्याचा मिल्क शेक कधी ट्राय केला आहे का? नाश्त्यासाठी हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे आणि खास गोष्ट म्हणजे तुम्ही काही मिनिटांत घरी तयार करू शकता. चवीला अप्रतिम असण्यासोबतच हे आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appफणस हे फायबर, व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त यासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते खूप आवडीने खातात, पण आज आम्ही तुम्हाला त्याची भाजी नव्हे तर मिल्क शेक कसा बनवायचा ते सांगणार आहोत. चहा किंवा कॉफीऐवजी तुम्ही तुमचा नाश्त्याची सुरूवात या रेसिपीने सुरू करू शकता.
जॅक फ्रूट मिल्क शेक बनवण्यासाठी साहित्य - जॅकफ्रूट पल्प - 1 कप,दूध - 1 कप, साखर - अर्धा टीस्पून, वेलची पावडर- अर्धा टीस्पून, सुका मेवा, पाणी - 1 कप
जॅक फ्रूट मिल्क शेक बनवण्यासाठी प्रथम फणसापासून बिया वेगळ्या करा. यानंतर मिक्सरच्या भांड्यात फणसाचा लगदा टाका.
नंतर त्यात उकळलेले दूध घालून बारीक करून त्याची स्मूद पेस्ट बनवा. आता या मिश्रणात साखर आणि वेलची पूड घाला.
यानंतर, हे मिश्रण पुन्हा एकदा बारीक करा आणि एका ग्लासमध्ये काढा. तुमचा जॅक फ्रूट मिल्क शेक तयार आहे. ड्रायफ्रुट्स आणि बर्फाचे तुकडे घालून थंड सर्व्ह करा.
फणस हे फायबर, व्हिटॅमिन ए, सी, थायामिन, पोटॅशियम, कॅल्शियम, रिबोफ्लेविन, लोह, नियासिन आणि जस्त यासारख्या अनेक पोषक तत्वांचे भांडार आहे.
हा एक अतिशय आरोग्यदायी पर्याय आहे आणि खास गोष्ट म्हणजे तुम्ही काही मिनिटांत घरी तयार करू शकता.