Egg Benefits : वाढत्या वयातही अंडी खाण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून घ्या
रोज एक किंवा दोन अंडी खाणे अगदी योग्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एक अंडे खाल्ल्याने तुम्हाला 6 ग्रॅम प्रोटीन तसेच मोठ्या प्रमाणात पोषण मिळते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे स्नायू मजबूत होतात. तसे, सर्व वयोगटातील लोकांनी अंडी खावीत. पण वाढत्या वयात निरोगी राहण्यासाठी रोज एक अंड खाल्लं गेलं पाहिजे.
बर्याच लोकांच्या शरीरात लोहाची कमतरता असते, ज्यामुळे ते डोकेदुखी, चिडचिडेपणा होऊन अशक्तपणाची तक्रार करतात. अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असते, जेणेकरून रक्त वाढतं, चयापचय वाढतं.
गर्भवती स्त्रिया आणि पाळी येणं थांबलेल्या स्त्रिया अनेकदा ही तक्रार करतात, म्हणून त्यांना अंडी खायला सांगितलं जातं.
अंड्यामधलं व्हिटॅमिन डी शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते. आपण वेगवेगळ्या गोळ्या खाऊन आजार कमी करतो पण अंडी खाल तर आजार दूर पळतील.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे, दात आणि नखे कमकुवत होतात. मग हाडे मजबूत करण्यासाठी आपल्याला विविध प्रकारची औषध घ्यावी लागतात. अशा वेळी जर अंड्याचे सेवन केले तर नैसर्गिकरित्या कॅल्शियम मिळेल.
अंड्याच्या पिवळ्या भागामध्ये पांढर्यापेक्षा जास्त पोषक घटक असतात. जीवनसत्त्वे, खनिजे सर्व त्यात आहेत, ज्यामुळे ते त्वचा आणि केसांसाठी चांगले आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.