Rice: भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा येऊ शकतो? जाणून घ्या...

health: भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते. कारण भात हा सहज पचणारा आणि जास्त कॅलरी देणारा पदार्थ आहे.

health(Pic credit:unsplash)

1/7
भात जास्त प्रमाणात खाल्ला तर लठ्ठपणा वाढण्याची शक्यता खूप असते. कारण भात हा सहज पचणारा आणि जास्त कॅलरी देणारा पदार्थ आहे.
2/7
पांढऱ्या तांदळात तंतुमय घटक (फायबर) कमी असतात, त्यामुळे तो खाल्ल्यानंतर लवकर भूक लागते आणि आपण नेहमीपेक्षा जास्त खातो.
3/7
जास्त प्रमाणात खाल्लेला भात शरीरात उर्जेत रूपांतरित होतो, परंतु ती उर्जा खर्च न झाल्यास ती चरबीच्या स्वरूपात साठते.
4/7
यामुळे हळूहळू पोटावर चरबी साठणे, वजन वाढणे, तसेच रक्तातील साखर वाढण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
5/7
विशेषतः रात्री भात जास्त खाल्ल्यास तो शरीरात लगेच खर्च न होता फॅटमध्ये बदलतो.
6/7
लठ्ठपणा टाळण्यासाठी भाताचं प्रमाण कमी ठेवणं, त्याऐवजी ब्राऊन राईस, उकड भात किंवा हातसडीचा तांदूळ वापरणं, भातासोबत भरपूर भाजी, डाळ, सूप किंवा सॅलड घेणं फायदेशीर ठरतं. तसेच नियमित चालणे, व्यायाम करणे आणि संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
7/7
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Sponsored Links by Taboola