Pumpkin Seeds : रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यापासून ते वजन कमी करण्यापर्यंत वाचा भोपळ्याच्या बियांचे फायदे
भोपळ्याच्या बिया आणि त्यांचे तेल त्वचेसाठी फायदेशीर आहे. बियांमध्ये असलेले व्हिटॅमिन ए आणि सी कोलेजनचे उत्पादन वाढवतात. कोलेजन जखम भरण्यास मदत करते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी अॅसिड चांगल्या प्रमाणात असतात. भोपळ्याच्या बियामध्ये जस्त भरपूर असते. यामुळे केसगळतीपासून सुटका मिळते.
भोपळ्याच्या बिया निरोगी चरबी, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहेत. भोपळ्याच्या बिया वजन नियंत्रित करू शकतात
भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने शरीरातील व्हिटॅमिन ई आणि झिंकची कमतरता भरून निघते. ‘व्हिटॅमिन ई’ त्वचेच्या आरोग्यासाठी लाभदायक असते. या जीवनसत्त्वामुळे त्वचा निरोगी आणि सुंदर राहण्यास मदत मिळते.
शारीरिक समस्या दूर करण्यासाठी आपल्या आहारामध्ये झिंकयुक्त फळे आणि भाज्यांचा समावेश करावा. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते. यामुळे शरीराच्या आतील बाजूस आलेली सूज दूर होण्यास मदत मिळते.
भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी व्हायरल प्रोपर्टीज आहेत. यामुळे आपल्या आरोग्याचं ताप, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होण्यास मदत मिळते.
प्रत्येक दिवशी दोन ते तीन चमचे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळू शकते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.