मधुमेहाचे रुग्ण आहात? तर तुम्ही या 5 फळांचे सेवन नक्की करू शकता; जाणून घेऊया..
निरोगी राहण्यासाठी आपण आपल्या आहारात फळांचा समावेश केला पाहिजे. फळांमध्ये भरपूर फायबर आणि जीवनसत्त्वे असतात. दररोज एकतरी हंगामी फळ खाल्ले पाहिजे.आरोग्याबाबत जागरूक असणाऱ्या लोकांनी एकावेळचे जेवण कमी करून, त्याऐवजी आहारात फळांचा समावेश केला, तर वजन कमी करणे देखील सोपे जाईल. मात्र, मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना योग्य फळे निवडणे थोडे अवघड जाते. अनेक वेळा मधुमेही रुग्णाला कोणती फळे खावीत आणि कोणती फळे मर्यादित प्रमाणात खावी, हेच कळत नाही. (photo:freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपीच : पीचमध्ये फायबर फूड असते. पीच खाल्ल्याने रक्तातील साखरही नियंत्रित राहते. सुमारे 100 ग्रॅम पीचमध्ये 1.6 ग्रॅम फायबर असते. उन्हाळ्यात भरपूर पीच बाजारात दिसतात. पीच हे पर्वतांमध्ये आढळणारे फळ आहे. साखरेच्या रुग्णाने पीच हे फळ जरूर खावे.(photo:freepik)
किवी : किवी हे फळ खायला खूप चविष्ट आहे. विशेष म्हणजे हे सर्व ऋतूंमध्ये सहज उपलब्ध होते. किवीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर प्रमाणात असते. अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी युक्त किवी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. यामुळे शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण कमी होण्यास मदत होते.(photo:freepik)
सफरचंद : सफरचंद आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीर अनेक आजारांपासून दूर राहते. सफरचंद हे मधुमेहाच्या रुग्णांसाठीही खूप चांगले फळ आहे. सफरचंदांमध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर असतात, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. सफरचंद खाल्ल्याने पोट चांगले राहते आणि वजनही नियंत्रित राहते.(photo:freepik)
संत्रे : फळांमध्ये संत्रे हे सुपरफूड मानले जाते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही संत्री खाणेही खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते, जे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.(photo:freepik)
पेरू : पेरू हे अत्यंत स्वस्त, पण आरोग्यासाठी फायदेशीर फळ आहे. पेरूमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजेच GI असतो, ज्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पेरूमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, फोलेट, पोटॅशियम यांसारखे पोषक घटक आढळतात. पेरू हे मधुमेह आणि हृदयाच्या रुग्णांसाठी खूप चांगले फळ आहे. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.(photo:freepik)