Weight Loss Tips : दररोज सकाळी 'असे' अॅपल सायडर व्हिनेगर प्या; शरीरातील चरबी लवकर कमी होईल
Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर अर्थात सफरचंद व्हिनेगरचा आहारात नक्कीच समावेश करा.

Health Tips
1/8
वजन कमी करण्यासाठी, डायटिंग आणि व्यायामासह अॅपल सायडर व्हिनेगर वापरा. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. सफरचंद सायडर व्हिनेगर कसे वापरावे ते जाणून घ्या.
2/8
लठ्ठपणा कमी करण्यासाठी अॅपल सायडर व्हिनेगर अर्थात सफरचंद व्हिनेगरचा आहारात नक्कीच समावेश करा. सफरचंद सायडर व्हिनेगर जलद वजन कमी करण्यास मदत करते हे अनेक संशोधनातून समोर आले आहे.
3/8
सफरचंदाच्या व्हिनेगरमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात, ज्यामुळे शरीराला पूर्ण पोषण मिळते. तुम्ही ते सॅलड म्हणूनही पिऊ शकता किंवा ड्रिंकमध्ये मिक्स करून घेऊ शकता.
4/8
सफरचंद सायडर व्हिनेगर सकाळी रिकाम्या पोटी प्या. यासाठी 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, अर्धा चमचा लिंबाचा रस, 1 चमचा मध आणि अर्धा चमचा मीठ एक ग्लास पाण्यात मिसळून प्या.
5/8
त्याच प्रकारे, तुम्ही रात्री जेवण करण्यापूर्वी देखील सफरचंद सायडर व्हिनेगर पिऊ शकता. यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत होईल.
6/8
अॅपल सायडर व्हिनेगर प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होऊ लागते. तसेच ते प्यायल्यानंतर जास्त वेळ भूक लागत नाही.
7/8
जे लोक दररोज सफरचंद सायडर व्हिनेगर पितात त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी कमी असते. रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने वजन वाढते.
8/8
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 10 Sep 2022 02:02 PM (IST)