Aloe Vera Benefits : कोरफडचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का? अनेक आजारांवर रामबाण उपाय
कोरफड या वनस्पतीचा आपला चेहरा उजळ करण्यासाठी तर उपयोग होतोच,पण त्याचबरोबर कोरफड आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरफडमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटीवायरल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म आहेत. यासोबतच कोरफडीमध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आढळतात.
कोरफडीत आढळणारे अँटिऑक्सिडंट पॉलीफेनॉल नावाच्या पदार्थांशी संलग्न असतात. यामुळे ते आपल्या शरीरातील जखमा भरून काढण्यात आणि त्वचेच्या समस्यांवर उपचार करण्यात खूप मदत करतात.
अँटी-व्हायरल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांव्यतिरिक्त, कोरफडमध्ये अमीनो अॅसिड आणि बी1, बी2, बी6 आणि सी जीवनसत्त्वे असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात.
कोरफडीचा वापर तोंडाचे अल्सर बरे करण्यासाठी देखील केला जातो. एलोवेरा जेलने केवळ तोंडाच्या अल्सरवर उपचार करता येत नाहीत तर अल्सरचा त्रासही कमी होतो.
दररोज एक चमचा कोरफडीचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होते. कोरफडमध्ये व्हिटॅमिन बी असल्यामुळे शरीरातील चरबीचे उर्जेमध्ये रूपांतर होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी सुद्धा कोरफडीचा वापर केला जातो. जेवणाआधी कोरफडीच्या रसाचे सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.