Trending: कपूर कुटुंबातील ही 21 वर्षीय मुलगी आहे पार्टी क्रेझी, कधी शाहरुख खानचा मुलगा तर कधी इतर मुलांबरोबर असते व्यस्त
तिचे सर्व फोटो शनाया कपूरच्या फॅन पेजवरुन घेण्यात आली आहेत, जी तिच्या चर्चेत आल्यानंतर जोरदार व्हायरल होत आहेत.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयापूर्वी सुहाना आणि अनन्यानेही आपले खाते खाजगी केले होते. खाते सार्वजनिक केल्यानंतर आता शनायाचे फोटो कोणीही पाहू शकते.
शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे खूप चांगले मित्र आहेत.
तिचे फोटो बर्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ती बॉलिवूडपासून दूर असली तरी तिचे फॉलोअर्स कोणत्याही स्टारकिड्सपेक्षा जास्त आहेत.
तिने आतापर्यंत तिचे अकाऊंट खासगी ठेवले होते. असे असूनही, तिची फॅन फॉलोईंग भरपूर आहे.
सोनम कपूर, रिया कपूर, जाह्नवी कपूर आणि खुशी कपूर यांनी चित्रपटसृष्टीत आपली कारकीर्द सुरू केल्यावर आता कपूर कुटुंबातील शनाया बॉलिवूडमध्ये यायची राहिली आहे. जरी खुशीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी अधिकृत केलं आहे.
फोटो पाहिल्यानंतर हे स्पष्ट होतंय की फॅशन स्टेंटमेंटच्या बाबतीत शनाया तिची आई महीप कपूर यांच्यावर गेली आहे.
शनाया आणि खुशी कपूर खूप चांगल्या मैत्रिणी तसेच चुलत बहिणी आहेत. या फोटोत आपण त्यांच्यातील घट्ट नातं पाहू शकता.
शनाया तिच्या कुटुंबाच्या जवळ आहे आणि संपूर्ण कुटुंबासमवेत बर्यापैकी चांगला वेळ घालवते.
अलीकडेच शनायाने तिचे इंस्टाग्राम पब्लिक केलं आहे. तिचे सोशल मीडिया हँडल पाहिल्यानंतर हे स्पष्ट झाले की तो खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.
शनाया बहुतेकदा डान्स क्लास आणि जिममध्ये जाताना पाहायला मिळते.
शनाया किंवा तिच्या आई-वडिलांनी या क्षणी काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाही.
अनन्याच्या बॉलिवूडमधील एन्ट्रीनंतर शनायाच्या नावाचीही चर्चा जोरात सुरू आहे की तीही लवकरच फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवू शकेल.
अनन्या आणि इतर मित्रांसोबत शनाया कपूर मस्ती करत आहे.
या चित्रात आपण शनायाला तिच्या मित्राबरोबर पार्टी मूडमध्ये पाहू शकता.
शनाया अनेक स्टार्सच्या मुलांची मैत्रीण आहे. यात अनन्या पांडे आणि सुहाना खान तिच्या बेस्ट फ्रेंड्सच्या यादीत पहिल्या आहेत. बर्याचदा या तिघी पार्ट्या आणि सुट्ट्या एन्जॉय करताना दिसतात.
तर अशाप्रकारे आम्ही तुम्हाला शनाया कपूरची जीवनशैली फोटोतून दाखवणार आहोत.
शनाया लहानपणापासूनच खूप लाडात वाढली असून खूप लॅविश जीवन जगते. अशात मैत्री, सेलिब्रेशन, सुट्टी आणि पार्टी तिच्या जीवनशैलीचा सर्वात महत्वाचा भाग आहे.
शनाया कपूर 21 वर्षांची असून फिल्म इंडस्ट्रीच्या प्रसिद्ध कपूर कुटुंबातील सर्वात धाकटी मुलगी आहे.
बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने अलीकडेच तिचे इंस्टाग्राम अकाउंट सार्वजनिक केलं आहे. त्यामुळे तिचे जुने फोटो सोशल मीडियावर उपस्थित असलेल्या तिच्या फॅन पेजवर व्हायरल होऊ लागली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -