कोरोनामुळे जेजुरीच्या खंडोबाची सोमवती अमावस्येची यात्रा रद्द; मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुजाविधी
सकाळी त्रिकालपुजा आणि महापुजा झाल्यानंतर या मोजक्या लोकांनीच गडावर भंडाऱ्याची उधळण करत परंपरेच पालन केलं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएरवी भंडाऱ्याच्या उधळणीने पिवळी झालेली सोन्याची जेजुरी यंदा मात्र शांत असणार आहे.
परंतु, देवाच्या पुजेत कोणताही खंड पडू न देता मंदिराचे पुजारी,सेवेकरी आणि विश्वस्त यांनी खंडेरायाचे पुजा विधी केले.
सोमवती अमावस्येच्या यात्रेच्या दिवशी जेजुरी गडावरुन उत्सवमुर्ती पालखीतून कर्हा स्नानासाठी गडाच्या पायथ्याशी नेण्यात येतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा पालखी सोहळाही रद्द करण्यात आला आहे.
खंडेरायाच्या जेजुरी गडावर सोमवती अमावस्येला मोठी यात्रा भरते. पण कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे.
कोरोना व्हायरसचा परिणाम अनेक धार्मिक कार्यक्रमांवर आणि सण-उत्सवांवर झाला आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक कार्यक्रम रद्दही करण्यात आले आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -