Italy Mount Etna Volcano: माऊंट एटना ज्वालामुखीचा स्फोट, नयनरम्य दृष्य पाहण्यासाठी लोकांची गर्दी
माऊंट एटना येथील ज्वालामुखी पाहण्यासाठी जगभरातून लोक याठिकाणी येतात. रात्रीच्या अंधारात हा ज्वालामुखी चमकतो ती दृष्य नयनरम्य असतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमाऊंट एटना ज्वालामुखी जवळपास 7 लाख वर्षांपासून सक्रीय आहे. दरवर्षी हा ज्वालामुखी जवळपास 10 लाख टन लावा आणि 7 मिलियन टन कार्बन डायॉक्साईड, पाणी आणि सल्फर डायऑक्साईडची निर्मिती करतो.
लावा चार किलोमीटरपर्यंत खाली पसरला आहे. मात्र या ज्वालमुखीच्या स्फोटामुळे आजूबाजूच्या शहरांना काहीही धोका नसल्याचं बोललं जात आहे.
ज्वालामुखीच्या स्फोटानंतर निघालेला लावा दूरवर पसरला आहे. युरोपातील सर्वात मोठ्या ज्वालामुखीतून निघणारा लावा पाहण्यासाठी लोकांनी याठिकाणी गर्दी केली आहे.
त्याआधी बऱ्याच दिवसांपासून ज्वालामुखीच्या अंतर्भागात हालचाली सुरु होत्या. एका आठवड्यात येथे ज्वालामुखीचे चार स्फोट झाले.
माऊंट एटना आपल्या ज्वालामुखीच्या स्फोटासाठी प्रसिद्ध आहे. या पर्वतावर अतिसक्रीय ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखीचा गेल्या आठवड्यात स्फोट झाला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -