जरा याद करो कुर्बानी... चीनसोबत लढताना धारातीर्थी पडलेल्या जवानांना सलाम
नायब सुभेदार नंदूराम सोरेन हे मयूरभंज जिल्ह्यातील चंपूडा या गावातले रहिवासी होते. नंदूराम शहीद झाल्याची बातमी कळाल्यानंतर आम्हा प्रचंड धक्का बसला, तो आमचा आणि आमच्या गावातला सर्वांचा लाडका होता, अशी प्रतिक्रिया त्यांच्या वडीलांनी दिली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतेलंगाणामधील संतोष बाबू यांना देशाची रक्षण करताना वीरमरण आलं. संतोष 16 बिहार रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर होते. संतोष यांच्या पश्चात त्यांची पत्नी, एक मुलगा व मुलगी असून ते दिल्लीत राहतात. गेल्याच रविवारी संतोष बाबू यांनी आपल्या आईशी फोनवरून संवाद साधला होता व सीमेवर तणाव असल्याचे त्यांना सांगितले होते. माझा मुलगा देशासाठी शहीद झाला, त्याचा मला अभिमान असल्याची त्यांच्या आईची प्रतिक्रिया होती.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गलवान घाटीमध्ये चीनच्या सैन्यासोबत झालेल्या झडपेत शहीद झालेल्या दोन जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रूपये आणि कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा बुधवारी केली. शिपाई राजेश ओरांग पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील रहिवाशी होते, तर बिपुल रॉय अलीपुरद्वार जिल्ह्याचे रहिवाशी होते.
शिपाई कुंदन कुमार ओझा हे मूळचे झारखंडमधील साहेबगंज जिल्ह्यातील दिहारी गावचे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कुंदन कुमार यांना 17 दिवसांपूर्वीच कन्यारत्न झाले होते. त्यांना चीनसोबत झालेल्या हिंसक झडपेत वीरमरण आले.
शिपाई कुंदन कुमार बिहारमधील सहरसा जिल्ह्यातील आरन गावात राहत होते. चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत त्यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या गावात वाऱ्यासारखी पसरली. संपूर्ण गावातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये लदाखमध्ये गलवान घाटीमध्ये हिंसक झडप झाली. त्यामध्ये छत्तीसगडमधील लाल यांनीही आहुती दिली. चिनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेमध्ये कांकेर जिल्ह्यातील वीर जवान गणेश कुंजाम शहीद झाले. गणेश 16 बिहार रेजिमेंटमध्ये शिपाई म्हणून कार्यरत होते.
नायक (NA) दीपक सिंह मध्य प्रदेशमधील रीवा जिल्ह्यातील फरांदा गावाचे रहिवाशी होते. राष्ट्रसेवा करताना त्यांनी वीरमरण आलं.
बिहारमधील समस्तीपूरमधील सुल्तानपुरपुरब हे शिपाई अमन कुमार यांचं मूळ गाव. त्यांच्या वडिलांनी सांगितले की, जर गरज भासली तर माझ्या दोन मुलांनाही देशसेवेसाठी पाठवणार. त्यांनी सांगितले की, चीनमुळे माझा मुलगा शहीद झाला.
शिपाई अंकुश ठाकूर हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील करोहटा गावात राहत होते. त्यांना चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत वीरमरण आलं.
पाटणातील बिहटा हे शहीद सुनाल कुमार यांचं मूळ गाव. 2004मध्ये त्यांचं लग्न झालं होतं. सुनील यांच्या पश्चात तीन मुलं आणि वृद्ध आई-वडिल आहेत. 6 महिन्यांआधी सुनील आपल्या घरी गेले होते. पण लॉकडाऊनमुळे ते पुन्हा सुट्टी घेऊन घरी जाऊ शकले नाहीत. त्यांच्या मुलीने माझ्या वडिलांच्या माझ्या वडिलांच्या वीरगतीचा बदला घ्या, असं सांगितलं आहे. चीनी सैनिकांसोबत झालेल्या हिंसक झडपेत सुनील कुमार शहीद झाले.
भारतीय सैन्य दलानेही आपल्या बहादूर जवानांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. भारताचे 20 जवान चीनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या हिंसक झडपेत शहीद झाले. जवानांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला दिलं आहे.
देशाच्या सेवेसाठी बलिदान देणाऱ्या वीर पुत्रांना लोक साश्रू नयनांनी शेवटचा निरोप देत आहेत. जवानांच्या अंत्ययात्रेसाठी अनेकांनी गर्दी केली आहे. तसेच लोक 'अमर रहे' अशा घोषणा देत आहेत.
भारत आणि चीनमध्ये गलवान व्हॅलीमध्ये झालेल्या झटापटीत भारताचे एकूण 20 जवान शहीद झाले आहेत. गेल्या 45 वर्षात असं पहिल्यांदा झालं आहे की, हिंसक झडपेत भारतीय जवानांना वीरमरण आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -