Bigg Boss 14 | बिग बॉसच्या घरात मराठमोळ्या निक्की तांबोळीची चर्चा; सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो व्हायरल

टेलिव्हिजन विश्वातील चर्चेत असणारा शो बिग बॉस 14 सुरु झाला आहे. बिग बॉसच्या घरात अनेक सेलिब्रिटींनी एन्ट्री घेतली आहे. परंतु, या सर्वांमध्ये चर्चा रंगल्या आहेत त्या निक्की तांबोळीच्या.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
केवळ 'बिग बॉस 14'च्या घरातच नाहीतर निक्की तांबोळी सोशल मीडियावरही सध्या चर्चेचा विषय बनली आहे. निक्की तांबोळी हे नाव गेल्या अनेक दिवसांपासून ट्रेडिंगमध्ये आहे.

चाहत्यांसोबत बिग बॉस होस्ट सलमान खानचंही (Salman Khan) निक्की तांबोळीने मन जिंकलं आहे. निक्की आपली मेहनत आणि त्याचसोबत ग्लॅमरमुळेही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे राहणारी मराठमोळी निक्की तांबोळीचा जन्म 21 ऑगस्ट 1996 मध्ये झाला. निक्कीचे वडील उद्योजक आहेत. निक्कीचं शालेय शिक्षण औरंगाबादमध्ये पूर्ण झालं आहे.
दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अदाकारीनं वर्चस्व गाजवणारी मराठमोठी निक्की तांबोळीने बिग बॉसमध्ये पहिल्याच आठवड्यात चाहत्यांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.
बिग बॉसच्या घरात या वीकेंडमध्ये निक्की तांबोळी (Nikki Tamboli) सोडून इतर सर्व सदस्य नॉमिनेटेड आहेत. म्हणजेच, आज त्यांच्यापैकी कोणीतरी एक सदस्य बेघर होणार आहे.
चाहत्यांना निक्कीचा ग्लॅमरस अंदाज पसंत पडत आहे. दरम्यान इन्स्टाग्रामवर निक्कीला फॉलो करणाऱ्या लोकांची संख्या 5 लाख 84 हजारांहून अधिक आहे. (सर्व फोटो : Instagram@NikkyTamboli)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -