In Pics : कोरोना काळात उत्तम सामाजिक काम करणाऱ्या दहा मंडळांना एबीपी माझाचा विघ्नहर्ता पुरस्कार
मुंबईतील पार्लेश्वर गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सवात रक्तदान शिबिर तर राबवलच शिवाय यंदा टाळेबंदीत या मंडळाने कौतुकास्पद काम केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर शहरातील एकजूट गणेश मंडळानं कोरोनाच्या संकटात समाजभान जपत अनेक सामाजिक उपक्रम हाती घेतले. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी 25 बेडचं कोविड सेंटर उभं केलं.
पुण्यातील भाऊरंगारी गणेशोत्सव मंडळ अनेकांसाठी विघ्नहर्ता बनलं. या गणेशोत्सवाच्या काळात त्यांनी केलेलं काम फार मोलाचं आहे.
जय हनुमान बाल मित्र मंडल, ज्याने फळे, फुले, प्रसाद याऐवजी भक्तांना शहाळे आणण्यासाठी प्रोत्साहित केले. आणि ही शेकडो शहाळी त्यांनी कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाऊन वाटली.
चिंचपोकळी गणेशोत्सव मंडळानेही छोटी मूर्ती बसवत आरोग्योत्सव साजरा केला. त्यांनी मोठ्या प्रमाणात रक्त संकलन केलं. तसंच गरजूंना मोठ्या प्रमाणात मदतही केली.
नाशिककरांचे श्रद्धास्थान आणि नाशिकचा मानाचा गणपती म्हणुन ओळखला जाणारा रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळाचा चांदीचा गणपती, गणेशोत्सवाच्या 103 वर्षाच्या इतिहासात प्रथमच गणेशोत्सव शांततेत आणि साधेपणाने साजरा करीत आहोत.
मागील 15 वर्षांपासून सोलापुरातील सुवर्णयोग मित्र मंडळ अविरतपणे सामाजिक कार्य करत आहे. कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक विडी कामगार आणि यंत्रमाग कामगारांचे मोठे हाल झाले.
औरंगाबादच्या संस्थान गणपती मंडळानं साधेपणानं उत्सव साजरा करण्याचं ठरवलं. गरजूंसाठी आरोग्य शिबीर. रक्तदान शिबीर यासह अन्य सामाजिक उपक्रम राबवत यावर्षी गणेश उत्सव साजरा केला आहे.
लालबागचा राजा मंडळाने त्यांनी यावेळी मूर्ती न बसवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेत आगोर्योत्सव साजरा केला त्यालाही उदंड प्रतिसाद मिळाला. प्लाझ्मा दानही मोठ्या प्रमाणात झालं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -