Rihanna | पॉप स्टार गायिका रिहानाचे 'हे' फोटो पाहिले का?
अमेरिकन पॉप स्टार रिहाना हिच्या एका ट्विटनंतर भारतात ट्वीटचं वादळ निर्माण झालं. मात्र, यापूर्वीही जगभरातील अनेक संवेदनशील मुद्द्यावर रिहानाने आपलं मत बिनधास्त व्यक्त केलं आहे. (All Pic - Rihanna twitter)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये रिहाना वनपिसमध्ये एकदम कूल दिसत आहे.
रिहानाच्या शेतकरी आंदोलनावरील या ट्वीटनंतर भारतात तिच्या नावाच्या गुगल सर्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तिच्या 10 कोटी संख्येने असलेल्या ट्विटर फॉलोअर्समध्ये काही वेळेतच दहा लाखांची अतिरिक्त भर पडली आहे.
दरम्यान या वादानंतर रिहानाने आज पुन्हा एक ट्वीट केलं आहे. मात्र, हे ट्वीट कुठल्याही विषयावर नसून तिने तिचे फोटो शेअर केले आहेत.
ट्विटर वादानंतर रिहानाच्या चाहत्यांमध्ये कमालीचा वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
आपल्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत रिहानाने आठ ग्रॅमी पुरस्कार आणि 14 बिलबोर्ड संगीत पुरस्कार जिंकले आहेत. तिच्या अनेक गाण्यांनी बिलबोर्ड हॉट 100 या यादीत स्थान मिळवलंय.
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा एक फोटो शेअर करत तिने 'आपण या विषयावर का बोलत नाही?' असा सवाल उपस्थित केला होता.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -