Birthday Special | सर्व चौकटी मोडून चित्रपटात स्विमसूट घालणाऱ्या बॉलिवूडमधील पहिल्या अभिनेत्री शर्मिला टागोर

त्यांनी चित्रपट निर्मात्यांना फोन करुन मुंबईतील सगळे पोस्टर्स हटवायला सांगितले होते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबईत त्यांचे स्विमसूटमधील पोस्टर शहरा शहरात लागले होते. जेव्हा त्यांना समजलं की, मंसूर यांची आई येणार आहे, त्यावेळी त्या घाबरुन गेल्या होत्या.

'अॅन ईवनिंग इन पॅरिस' दरम्यान शर्मिला टागोर यांच्याशी निगडीत एक किस्सा अत्यंत प्रसिद्ध आहे. त्यावेळी शर्मिला आणि मंसूर अली खान पटौदी रिलेशनशिपमध्ये होते. मंसूर यांची आई शर्मिला यांना भेटण्यासाठी मुंबईत येणार होती.
त्याचसोबत 1967 मध्ये आलेला चित्रपट आमने-सामनेमध्येही शर्मिला टागोर यांनी स्विमसूट घातला होता.
शर्मिला टागोर यांनी फिल्मफेयर मॅगझिनच्या ऑगस्ट 1966च्या अंकासाठी टू पीस बिकनी वेअर केली होती. भारतात हे पहिल्यांदाच एखाद्या लोकप्रिय अभिनेत्रीने बिकिनी फोटोशूट केलं होतं.
1967 मध्ये रिलीज झालेला चित्रपट अॅन ईवनिंग इन पॅरिसमध्ये शर्मिला टागोर यांनी स्विमसूट घातला होता. असं करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय अभिनेत्री होत्या.
दरम्यान, याआधी बॉलिवूडच्या अभिनेत्री त्यांच्या नाजूक अदांसाठी ओळखल्या जात होत्या.
'कश्मीर की कली' या चित्रपटातील आपल्या लाजाळू आणि नाजूक भूमिकेतून बाहेर पडत 'अॅन ईवनिंग इन पॅरिस' या चित्रपटात शर्मिला टागोर यांनी पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर स्विमसूट घातला होता. त्यानंतर त्या विवादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या. पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एखादी अभिनेत्री बोल्ड अंदाजात दिसून आली होती.
8 डिसेंबर 1944 रोजी जन्मलेल्या शर्मिला टागोर यांनी कश्मीरची कली, वक्त, आराधना, आमने-सामने यांसारख्या अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केलं.
शर्मिला टागोर आपल्या करियर दरम्यान बिकीनी फोटोशूट आणि आंतरजातीय लग्न केल्यामुळे त्या बराच काळ चर्चेत होत्या.
या वयातही शर्मिला टागोर या अनेकांच्या फॅशन आयकॉन आहेत. त्याचसोबत शर्मिला यांनी खऱ्या आयुष्यातही अनेक चौकटी मोडून आपलं आयुष्या मनाप्रमाणे जगलं आहे.
बॉलिवूडची अदाकार म्हणजेच दिग्गज अभिनेत्री शर्मिला टागोर आज आपला 76वा वाढदिवस साजरा करत आहेत. शर्मिला टागोर म्हणजे, बी टाऊनमधील सर्वात आयकॉनिक अभिनेत्रींपैकी एक. आपलं अभिनय, डान्स आणि आपल्या सौंदर्यामुळे आजही त्या अनेकांच्या गळ्यातील ताईत आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -